बंडखोर आमदारांच्या मनधारणीसाठी कर्नाटक मुख्यमंत्री मुंबईत?
कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत.
मुंबई/बंगळुरु : कर्नाटकातील राजकारणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहे. कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या एकूण 13 बंडखोर आमदारांची मनधारणी करण्यासाठी आता कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार हे स्वत: मुंबईत येणार आहेत. मात्र या आमदारांनी जीवाला धोका असल्याचे कारण देत मुख्यमंत्री कुमारस्वामीना भेटण्यास नकार दिला आहे. दरम्यान सध्या राजीनामा दिलेले आमदार पवईतील रेनिसान्स हॉटेलमध्ये थांबले आहेत.
नुकतंच काँग्रेस नेते डी.के. शिवकुमार आणि आमदार शिवलिंगे गोडा हे मुंबईत दाखल झालेत. यावेळी शिवकुमार यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. “मुंबई पोलीस हे त्यांचं काम करत आहेत. आम्ही आमच्या मित्रांना भेटण्यासाठी आलो आहोत. आम्ही सर्वांनी राजकारणात एकत्रित जन्म घेतला आहे. त्यामुळे आमचा मृत्यूही एकत्र राजकारणातच होईल. ते सर्व आमच्या पक्षाची माणसे आहेत आणि त्यामुळे आम्ही त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत. असे प्रतिक्रिया डी के शिवकुमार यांनी दिली”.
Karnataka Minister DK Shivakumar, in #Mumbai: Let Mumbai Police or any other force be deployed. Let them do their duty. We’ve come to meet our friends. We were born together in politics, we will die together in politics. They are our party men. We have come to meet them. pic.twitter.com/F7fCh7i6kh
— ANI (@ANI) July 10, 2019
त्याशिवाय या 13 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी काल (9 जुलै) काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे केली आहे. त्यानुसार सत्ताधारी पक्षांतील 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांनी सादर केलेले राजीनामे विहित नमुन्यात नसल्याने त्यांना पुन्हा राजीनामा पत्र पाठविण्याचे निर्देश रमेशकुमार यांनी दिले आहेत.
10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs write to Mumbai Commissioner of Police stating “We are staying at Hotel Renaissance Powai in Mumbai, we have heard HD Kumaraswamy & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened. Do not allow them to enter hotel premises” pic.twitter.com/rvMa2If8eH
— ANI (@ANI) July 9, 2019
त्यानंतर आता बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कॉंग्रेस नेते डी. के. शिवकुमार बुधवारी मुंबईत येणार आहे. विशेष म्हणजे शिवकुमार यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai: Security increased outside Hotel Renaissance in Powai where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. The MLAs had earlier written a letter to Mumbai Commissioner of Police stating “We’ve heard CM & DK Shivakumar are going to storm the hotel, we feel threatened” pic.twitter.com/j0vp3pAQCm
— ANI (@ANI) July 9, 2019
दरम्यान या पार्श्वभूमीवर सर्व बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांकडे पत्र पाठवून हॉटेलबाहेर सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. या आमदारांनी आमच्या जीवाला धोका असल्याचे सांगत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे आमदार थांबलेल्या हॉटेल बाहेर मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
बंडखोर आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेता यावे आणि त्यांची नाराजी दूर व्हावी यासाठी सर्व सत्ताधारी मंत्र्यांनी राजीनामे देऊन मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे. तर दुसरीकडे भाजपकडून ‘ऑपरेशन कमळ’ वारंवार सुरु करण्यात येत होतं. यामुळे भाजप नेते प्रसाद लाड आणि भाजप मुंबईचे अध्यक्ष मोहित कंबोज यांनीही या आमदारांची भेट घेतली होती.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसच्या 11 आमदारांनी शनिवारी (6 जुलै) विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जाऊन राजीनामा दिला होता. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे 8, तर जेडीएसचे 3 आमदार होते. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस आमदारांच्या राजीनाम्याचं सत्र सुरुच आहे. राजीनामा देऊन हे सर्व आमदार मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील सोफिटेल हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर काँग्रेससह भाजपच्याही नेत्यांनी सोफिटेल हॉटेल गाठले.
कर्नाटकात राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचं काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात आहे. भाजप नेते येडीयुरप्पा पुन्हा सत्ता स्थापन्याच्या तयारीत आहेत.
#Mumbai: Security deployed outside Renaissance – Mumbai Convention Centre Hotel, where 10 rebel Karnataka Congress-JD(S) MLAs are staying. Karnataka Minister DK Shivakumar is currently on his way from the airport to the hotel. pic.twitter.com/1jidVLdmcb
— ANI (@ANI) July 10, 2019
कर्नाटक विधानसभा निवडणूक
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी गेल्या वर्षी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 80 आणि जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजप पहिल्या क्रमांचा पक्ष ठरला होता, मात्र काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसचे कुमारस्वामी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. इथे सत्ता स्थापनेसाठी 113 जागांची गरज आहे.
कर्नाटकातील पक्षीय बलाबल
कर्नाटक विधानसभेत एकूण 225 जागा आहेत, तर एक नामांकित सदस्य आहे. बहुमतासाठी 113 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेस 80 जेडीएस 37, केपीजेपी 1, बसपा 1 आणि 1 अपक्ष अशा 120 आमदारांसह सध्या काँग्रेस-जेडीएसची सत्ता आहे. भाजपचे 104 आमदार निवडून आले होते. त्यामुळे भाजपला आणखी किमान दहा आमदारांची आवश्यकता आहे. आपल्याला 120 आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे सरकारला कोणताही धोका नसल्याचं कुमारस्वामींनी यापूर्वी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या :
कर्नाटकात राजकीय भूकंप, उपमुख्यमंत्र्यांसह 32 मंत्र्यांचे राजीनामे
कर्नाटक सरकारचे भवितव्य मुंबईच्या हॉटेलमध्ये ठरणार?
कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे, जेडीएस-काँग्रेस सरकार धोक्यात
कर्नाटकात उलथापालथ निश्चित, काँग्रेस-जेडीएसचे 10 आमदार राजीनामा देऊन मुंबईत