Anil Bonde : संघटनांमुळेच अमरावतीमध्ये भीतीदायक वातावरण, नवनीत राणांना आलेल्या धमकीवरुन बोंडेंचे मोठे विधान
सध्या राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा, मस्जिदवरील भोंगे हे विषय चर्चेत आहे. असे असतानाच खा. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी गतवर्षी देण्यात आली होती. हनुमान चालीसा म्हणटल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली होती. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली होती.
अमरावती : (Umesh Kolhe) उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर (Amvravati) अमरावतीमधील वातावरण गढूळ झाले आहे. एक प्रकारची भिती प्रत्येकाच्या मनात दडलेली आहे. असे वातावरण शहराच्या विकासासाठी आणि समाजात सलोखा वाढण्यासाठी पोषक नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने रझा अकादमी आणि पीएफ आय संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी खा. नवनीत राणा यांना आलेली धमकी ही देखील सहजरित्या न घेता याचा गांभिर्यपूर्ण विचार होणे गरजेचे आहे असे मत भाजपाचे (Ani Bonde) खा. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे. या संघटनांचे केंद्रबिंदू हे अमरावती आणि अचलपूर हे ठरत आहे. त्यामुळे बोंडे यांनी ही मागणी केली असून यानंतर नेमका काय निर्यण घेणार हे पहावे लागणार आहे.
पी.एफ.आय संघटनेच्या सदस्याची चौकशी
अमरावतीमधील संघटनांमध्ये वातावरण ढवळून गेलेले आहे. मध्यंतरी उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर शहारातील वातावरण अद्यापही उदासच आहे. असे असतानाच उमेश कोल्हेच्या हत्येप्रकरणी पीएफ.आय संघटनेच्या संदस्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. शिवाय या संघटनाचे केंद्र अमरावती आणि अटलपूर हे दोनच आहे. शिवाय अशा संघटनांकडून शहरातील वातावरण भयभीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे शहारात अशांतता निर्माण होत आहे. अशा संघटनावर कायमची बंदी आणण्याची मागणी होत आहे. अनिल बोंडे यांनी तर केंद्राकडे आणि राज्याकडे देखील अशी मागणी केली आहे.
त्या धमकी मागचे गांभीर्य ओळखले पाहिजे
सध्या राज्यात हिंदुत्व, हनुमान चालिसा, मस्जिदवरील भोंगे हे विषय चर्चेत आहे. असे असतानाच खा. नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी गतवर्षी देण्यात आली आहे. हनुमान चालीसा म्हणटल्यास तुम्हाला ठार मारू अशी धमकी दिल्याची तक्रार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आली होती. एका मुस्लिम धर्मगुरू कडून फोन कॉल आल्याची माहिती नवनीत राणा यांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर त्या प्रकारणाची अद्यापरर्यंत उकल झालेली नाही. ह्या आशा गोष्टींचे गांभीर्य ओळखून अशा संघटनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणार
राज्यात विशेषत: विदर्भात पीकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सध्या अजित पवार यांचा दौरा सरु असून ते पीक पाहणी करीत आहेत. मदती संदर्भात अजित पवार यांना विश्वास नसला तरी विदर्भातील शेतकऱ्यांना मदत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त बोंडे यांनी व्यक्त केला आहे. सध्या शेतामध्ये पाणी साचल्याने पंचनामे करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. पीक पेरणी होताच राज्यात पावसाने हाहाकार केला होता. त्यामुळे पिकांची पाहणी आणि पंचनामे होताच मदत रक्कम हे मिळवूण देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.