BKC नाही शिवतीर्थावरच होणारा दसरा मेळावा? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत सूचक वक्तव्य
दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीत शिंदे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यार असल्याची घोषणा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मुंबई : दसरा मेळाव्याच्या(Shivsena Dasara Melava 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात चढाओढ सुरु आहे. अशातच शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार असल्याची माहिती समोर येत होती. मात्र, हा दसरा दसरा मेळावा शिवतीर्थावरच व्हायला हवा अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. यामुळे शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा कुठे घ्यायचा यावर शिंदे गटाची बैठक पार पडली. या बैठकीत दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा झाली असून शिवाजी पार्कवरच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दसरा मेळावा शिवतीर्थावर जोरात साजरा होणार असे देखील एकनाथ शिंदेंनी या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीत शिंदे यांनी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यार असल्याची घोषणा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी शिंदे गाटाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा भाग ठेवा अशी तंबी देखील त्यांनी आमदारांना दिलेली आहे.
महाराष्ट्रात संघटनात्मक बांधणी करा. आगामी पालिका, ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरा. दसरा मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र, यासह कायदा आणि सुव्यवस्थेचं भान ठेऊन वागा अशी तंबी देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
या बैठकीत शिंदे गटातील आमदार, खासदारांना जिल्हा पातळीवर जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आले. बैठकीत शिंदे गटातील काही नेत्यांची नेते आणि उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. हिंदू गर्व गर्जना यात्रा ताकदीने यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे झाला पाहिजे. याबाबत सकारात्मक निर्णय होईल. त्यामुळे जे काय होईल ते नियमानुसार होईल असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळावा नेमका कुठे होणार? या प्रश्नावर उत्तर दिले आहे.
कोणत्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे आक्रमक आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाने देखील दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र, यावर अद्याप काहीही अपडेट समोर आलेली नाही.