President Election : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, उद्या मतदान, काऊंटडाऊन सुरू; काय आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित?

President Election : लोकसभेतील खासदार आणि विधानसभेतील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. नामनिर्देशित खासदार आणि आमदार तसेच विधान परिषदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. खासदाराच्या एका मताचं मूल्य 708 वरून 700 झालं आहे.

President Election : द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, उद्या मतदान, काऊंटडाऊन सुरू; काय आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित?
द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा?, आज मतदान, काऊंटडाऊन सुरू; काय आहे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं गणित?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 6:18 PM

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं (president election) काऊंटडाऊन सुरू झालं आहे. उद्या 18 जुलै रोजी त्यासाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार असून या निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत. तर संयुक्त पुरोगामी आघाडीने (UPA) यशवंत सिन्हा यांना उमेदवार केलं आहे. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून येतात. त्यामुळे देशाच्या राष्ट्रपतीपदी बसण्याचा मान आदिवासी पहिल्यांदाच मिळणार असल्याने त्यांच्या बाजूने आदिवासी खासदार एकवटले आहेत. दुसरीकडे यशवंत सिन्हा हे संपुआचे उमेदवार आहेत. सिन्हा हे पूर्वी भाजपमध्ये होते. आता तृणमूल काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे भाजपची मते खेचून आणण्यात यशवंत सिन्हा यशस्वी ठरतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे समाजवादी पार्टीने यशवंत सिन्हा यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे संपुआत असूनही शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे.

कुणाकडे किती मते

एकूण मते – 10, 79, 206

हे सुद्धा वाचा

एनडीए- 5, 26, 420

यूपीए- 2, 59, 892

इतर- 2,92, 442

विजयासाठी हवी असणारी मते – 5,49, 442

एनडीएला कुणा कुणाचा पाठिंबा

भाजप बीजेडी वायएसआर काँग्रेस बसपा शिवसेना एआयडीएमके जनता दल (सेक्लुयर) तेलुगु देशम पार्टी शिरोमणी अकाली दल झारखंड मुक्ति मोर्चा

एकूण मतदार किती?

लोकसभा – 543 खासदार

राज्यसभा – 233 खासदार

विधानसभा – 4120 आमदार

एनडीएकडे एकूण 10,86,431 मतांपैकी 6.67 लाखाहून अधिक मते आहेत. मुर्मू यांच्या मतांची भागिदारी 61 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते.

प्रत्येक राज्याची मतांची व्हॅल्यू वेगळी

लोकसभेतील खासदार आणि विधानसभेतील आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. नामनिर्देशित खासदार आणि आमदार तसेच विधान परिषदेच्या सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. खासदाराच्या एका मताचं मूल्य 708 वरून 700 झालं आहे. कारण जम्मूकाश्मीरमध्ये सध्या विधानसभेचं अस्तित्व नाहीये. उत्तर प्रदेशातील 403 आमदारांच्या प्रत्येक मतांचं मूल्य 208 आहे. म्हणजे त्यांचं एकूण मूल्य 83,824 एवढं आहे. तामिळनाडू आणि झारखंडमधील प्रत्येक आमदाराच्या मतांचं मूल्य 176 आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील आमदारांच्या मतांचं मूल्य 175, बिहारमधील आमदारांच्या मतांचं मूल्य 173 आणि आंध्र प्रदेश प्रत्येक आमदारांच्या मताचं मूल्य 159 आहे.

छोट्या राज्यांच्या मतांचं मूल्य

छोट्या राज्यांमध्ये सिक्किममधील प्रत्येक आमदारांच्या मताचं मूल्य सात आहे. अरुमाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येक आमदाराच्या मतांचं मूल्य 8, नागालँड 9, मेघालय 17, मणिपूर 18 आणि गोव्यातील आमदारांच्या मताचं मूल्य 20 आहे. पुद्दुचेरीतील एका आमदाराच्या मताचं मूल्य 16 आहे.

मतांचं मूल्य असं ठरतं

या निवडणुकीत आधी आधी सर्व राज्यांच्या विधानसभेतील आमदारांच्या मतांचं मूल्य काढलं जातं. या मूल्यांचं विभाजन राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांच्या संख्येसोबत केलं जातं. या भागाकारानंतर जो आकडा येतो तो आकडा खासदारांचं मूल्य असतो.

काय आहे गणित?

ज्याला जास्त मते मिळतात तो निवडून येतो, असं गणित या निवडणुकीत नसतं. या निवडमुकीत एकूण मतदारांच्या सरासरीनुसार ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात तो उमेदवार राष्ट्रपती बनतो. यंदा या निवडणुकीसाठी इलेक्टोरल कॉलेज आहे, त्या सदस्यांच्या एकूण मतांचं मूल्य 10,98,882 आहे. त्यामुळे राष्ट्रपती पदासाठी निवडून येण्यासाठी उमेदवाराला 5,49,441 मतं मिळणे गरजेचं आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.