Nasik NMC Election 2022 Ward 25 : प्रभाग रचनेचा बदल कुणाचे भाग्य बदलणार? शिवसेनेचा बालेकिल्ला भाजप भेदणार का?; जाणून घ्या प्रभागाची सद्यस्थिती

यंदा नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभागातील काही भाग विभागले गेले असून त्यांचा दुसऱ्या प्रभागात समावेश झाला आहे. नव्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत 133 जागा असणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत अनेक बदल झाले असल्यामुळे आधीपासूनच निवडणुकीची तयारी करणाऱ्या नवोदित उमेदवारांना झटका बसला आहे.

Nasik NMC Election 2022 Ward 25 : प्रभाग रचनेचा बदल कुणाचे भाग्य बदलणार? शिवसेनेचा बालेकिल्ला भाजप भेदणार का?; जाणून घ्या प्रभागाची सद्यस्थिती
नाशिक महापालिकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 29, 2022 | 11:55 PM

नाशिक : मुंबई, पुण्याप्रमाणेच नाशिक महापालिके (Nashik Municipal Corporation)ची निवडणूकही राज्याच्या राजकीय वर्तुळात अधिक लक्षवेधी ठरणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) या दोन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 31 प्रभाग होते, यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभागांची संख्या वाढली असून ती आता 44 झाली आहे. त्यामुळे असुरक्षित वाटणाऱ्या मतदारसंघात दिग्गज उमेदवार रिंगणात उतरवून आपल्या पक्षाचे पारडे जड ठेवण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजप आणि विरोधी बाकावरील शिवसेनेकडून जात आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये मागील अर्थात 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने आपले वर्चस्व अबाधित राखले होते. यंदा नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभागातील काही भाग विभागले गेले असून त्यांचा दुसऱ्या प्रभागात समावेश झाला आहे. नव्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत 133 जागा असणार आहेत. प्रारूप प्रभाग रचनेत अनेक बदल झाले असल्यामुळे आधीपासूनच निवडणुकीची तयारी करणाऱ्या नवोदित उमेदवारांना झटका बसला आहे. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणेही बदललेली दिसणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या प्रभागातून कोण बाजी मारणार? शिवसेना की महापालिकेतील विद्यमान सत्ताधारी भाजप? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागाची लोकसंख्या (जयभवानी रोड परिसर, फर्नांडिस वाडी, जेतवन नगर)

एकूण लोकसंख्या – 30869 अनुसूचित जाती – 5054 अनुसूचित जमाती – 822

प्रभागात कुठे कोणते आरक्षण आहे?

महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यानंतर अलीकडेच या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यानुसार जाहीर झालेले आरक्षण पुढीलप्रमाणे –

हे सुद्धा वाचा

25 अ – अनुसूचित जाती 25 ब – सर्वसाधारण महिला 25 क – सर्वसाधारण खुला

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागाची व्याप्ती कोठून कुठपर्यंत?

नव्या प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 25 मध्ये अश्विन कॉलनी, जेतवन नगर, मनोहर गार्डन, फर्नांडिस वाडी, मुक्तिधाम मंदिर, गायखे कॉलनी, घाडगे नगर, बिटको कॉलेज या प्रमुख भागांचा समावेश होतो.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष/इतर

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काय चित्र होते?

प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीत चारही जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. अ वॉर्डमधून शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर, ब वॉर्डमधून त्यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, क वॉर्डमधून शामकुमार साबळे आणि ड वॉर्डमधून चारूशीला गायकवाड यांनी विजय मिळवला होता. नव्या प्रभागरचनेनुसार या प्रभागातील जवळपास 80 टक्के भाग हा नवीन प्रभाग क्रमांक 31 मध्ये समाविष्ट झाला आहे. या नव्या बदलाचा फायदा घेत भाजपकडून शिवसनेच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला जातोय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (elections maharashtra municipal corporation election nmc nashik ward 25)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.