Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांसमोरही आव्हानांचा डोंगर? शिंदेंसोबतचं सरकार सोप्पं असेल? 5 आव्हानं लक्षात असू द्या

मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं सरकार सोपं असेल का? असा सवालही राजकीय वर्तुळातून विचारला जातोय.

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांसमोरही आव्हानांचा डोंगर? शिंदेंसोबतचं सरकार सोप्पं असेल? 5 आव्हानं लक्षात असू द्या
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 11:12 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडाळी, त्यांना मिळालेली तब्बल 50 पेक्षा अधिक आमदारांची साथ, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला विरोधातील निकाल, या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सहकारी शरद पवार (Sharad Pawar) आणि सोनिया गांधी यांचे आभार मानले. तसंच आपल्याच पक्षातील लोकांनी बंडखोरी केल्यानं ठाकरे यांनी खंतही बोलून दाखवली. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे आता भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झालाय. कारण, एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सहकार्य करतील अशीच शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरही मोठं आव्हान असणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं सरकार सोपं असेल का? असा सवालही राजकीय वर्तुळातून विचारला जातोय.

सत्तेचं वाटप कसं होणार?

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार भाजपला पर्यायानं देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेसाठी मदत करतील. मात्र, त्यासाठी भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सत्तेचं वाटप कसं होणार? शिंदे गटाला किती कॅबिनेट, किती राज्यमंत्री, किती महामंडळं दिली जाणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटाला भाजपकडून 13 मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्रीपदाचा समावेश असेल.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवेसनेला तोंड देणे

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. अशास्थितीत शिवसेनेला पुन्हा उभारी देणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलाय. ठाकरे पिता-पुत्रांनी शिवसैनिकांच्या बैठकाचा सपाटाच लावलाय. शिवसेनेचा इतिहास पाहता रस्त्यावर लढणारा पक्ष म्हणूनच शिवसेनेची ख्याती आहे. त्यामुळे फडणवीस आणि शिंदे यांच्या सरकारसमोर शिवसेनेचंच मोठं आव्हान असणार आहे.

सहकारी आणि छोट्या पक्षांना सांभाळणे

2014 मध्ये राज्यात युती सरकार आलं. मात्र पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करता करता फडणवीसांच्या नाकीनऊ आले होते. कारण शिवसेनेच नेते आपण खिशात राजीनामा घेऊन असल्याचं वारंवार सांगत होते. त्याच शिवसेनेतील नेते आता शिंदे गटाच्या रुपात फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी असणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आपल्या सहकाऱ्यांना आणि छोट्या पक्षांना सोबत घेऊन सरकार यशस्वीरित्या उरलेली अडीच वर्षे सरकार चालवावं लागणार आहे.

कोरोनामुळे आर्थिक गर्तेत अडकलेल्या राज्याला पुन्हा उभारी देणे

कोरोना काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या नेतृत्वात विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यात ते किती यशस्वी झाले हा अभ्यासाचा विषय असेल. पण आता देवेंद्र फणडणवीस यांना राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आगामी फडणवीस सरकारसाठी अजून एक आव्हान असणार आहे. ओबीसींचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सध्या सुरु आहे. मात्र, तो डेटा गोळा करण्याची प्रक्रियाच चुकीची असल्याचा आरोप फडणवीस यांनीच केला होता. अशावेळी योग्य डेटा गोळा करणे, त्या आधारे सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे मांडणे आणि ओबीसी समजाला राजकीय आरक्षण पुन्हा मिळवून देणे, हे आव्हानही फडणवीस सरकारसमोर असेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.