Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?

Rajya Sabha Election 2022: गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे.

Rajya Sabha Election 2022: काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?
काँग्रेस, राष्ट्रवादीने मतांचा कोटा वाढवला, अतिरिक्त चार मतांमुळे शिवसेनेचा उमेदवार धक्क्याला लागणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 10:25 AM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) मतदान सुरू झालं आहे. सर्वच पक्षाच्या आमदारांनी टप्प्याने मतदान करत आहेत. मात्र हे मतदान सुरू झालेलं असतानाच काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादीने (ncp) अचानक मतांचा कोटा वाढवला आहे. आपल्या प्रत्येक उमेदवाराला 42 मते द्यायचं ठरलं होतं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा हा कोटा 44 केला आहे. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आला आहे. अचानक दोन्ही पक्षांनी दोन दोन मतांचा कोटा वाढवला आहे. म्हणजे एकूण चार मते अतिरिक्त जाणार असल्याने शिवसेना उमेदवार संजय पवार यांची कोंडी होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे महावविकास आघाडीत मतांच्या कोट्यावरून धुसफूस सुरू झालेली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याकडे रवाना होत असल्याने चर्चांना अधिकच उधाण आलं आहे. तर, मतांचा कोटा वाढवण्यात आल्याची ही अफवा असून भाजपनेच ही बातमी पेरल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

गेल्या चार दिवसांपासून महाविकास आघाडी राज्यसभा निवडणुकीचे डावपेच ठरवत आहेत. आघाडीच्या आमदारांना दगाफटका होऊ नये म्हणून या आमदारांना तिन्ही पक्षांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. तसेच या आमदारांचं प्रशिक्षणही झालं. मतदान कसं करायचं याची माहिती या आमदारांना देण्यात आलं. त्या शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना मतदानाबाबत मार्गदर्शनही केलं होतं.

हे सुद्धा वाचा

मतांचं काय ठरलं होतं?

यावेळी प्रत्येक उमेदवाराला 42 मते देण्याचं ठरलं होतं. मात्र, अचानक राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आपला मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 44 केला आहे. मतं बाद होऊन दगाफटका होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. कोणीही मतांचा कोटा वाढवला नाही. ही भाजपने पेरलेली बातमी आहे, असं खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं. तर कोणी काही सांगू द्या. मतांचा कोटा वाढलेला नाही. संध्याकाळी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

शरद पवार पुण्याकडे

दरम्यान, आमदारांचं मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पुण्याला रवाना होत आहेत. इकडे आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा असताना पवार पुण्याकडे जात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, मतांचा कोटा वाढवल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून काहीही भाष्य करण्यात आलेलं नाही.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.