CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातेत जात असल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरेंना होती? एकनाथ शिंदेंनी सभागृहात स्पष्टच सांगितलं!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आपल्या गुप्त बैठका कशा सुरु होत्या, त्याची माहितीही शिंदे यांनी उघडपणे सांगितलं. त्यावेळी फडणवीसांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतल्याचंही पाहायला मिळालं.

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातेत जात असल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरेंना होती? एकनाथ शिंदेंनी सभागृहात स्पष्टच सांगितलं!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: Vidhan Sabha
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 7:53 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सभागृहात जोरदार भाषण केलं. शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. बंडखोरीनंतर शिंदे यांनी आपल्या मनातील भावना थेट सभागृहात मांडल्या. त्यावेळी उपस्थितांनीही शिंदे यांच्या भाषणाला चांगली दाद दिली. महत्वाची बाब म्हणजे आपल्या बंडाची किंबहुना आपण गुजरातला जात असल्याची संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना होती. त्यांनी आम्हाला गुजरातमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्नही केला, असं शिंदे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं. इतकंच नाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आपल्या गुप्त बैठका कशा सुरु होत्या, त्याची माहितीही शिंदे यांनी उघडपणे सांगितलं. त्यावेळी फडणवीसांची चांगलीच गोची झाली आणि त्यांनी डोक्यावर हात मारुन घेतल्याचंही पाहायला मिळालं.

‘मलाही माहितीय नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते’

त्या दिवशी माझी सरकली होती. आमचे दोघे पडले तर म्हणतील गद्दारी केली, म्हटलं दोन्ही निवडून आले पाहिजे आणि तुम्हाला सांगतो दोन्ही निवडून आले. आम्हाला फोन आले साहेबांचे, म्हणाले आपले दोन्ही निवडून आले, पुढे चालले. म्हटलं ते पुढे चाललेत पण आता मी कुठे चाललोय मला माहिती नाही. मी आपला सुसाट गेलो. तुम्हाला सांगतो मी काही प्लॅनिंग केलं नाही. मी बोलत बोलत गेलो, सरळ गेलो. याचं तिकडे पुढे आहे ना आपलं बॉन्ड्रीच्या बाहेर तिकडे गेलो, असं म्हणत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इशारा केला. तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला. तेव्हा शिंदे म्हणाले की आता लपवायचं काय? तुमच्याकडे टॉवर लोकेशन, सगळं आहे. पटापट पटापट माहिती पडलं. नाकाबंदी केली, आयजीला सांगितलं नाकाबंदी करा. अरे पण मीही काहीतरी, कितीतरी वर्षे काम केलंय ना. मलाही माहितीय नाकाबंदीतून कसं निघायचं असतं ते, असं शिंदे यांनी सांगितलं.

‘…आणि फडणवीसांनी थेट डोक्यावर हात मारून घेतला’

इतकंच नाही तर फडणवीस हे सगळ्यात मोठे कलाकार असल्याचं सांगतानाच शिंदे यांनी फडणवीसांसोबतच्या गुप्त बैठकांचा किस्साही सांगून टाकला. तेव्हा मात्र, फडणवीस यांनी थेट डोक्याला हात लावल्याचंच पाहायला मिळालं. शिंदे म्हणाले की, सगळ्यात मोठे कलाकार हे आहेत. आम्ही कधी भेटायचो, ते आमच्या लोकांनाही कळायचं नाही. आमचे सगळे लोक झोपल्यावर मी जायचो आणि ते उठायच्या आत मी परत यायचो. एकनाथ शिंदे यांना हा किस्सा सांगितल्यानंतर तर सभागृहात उपस्थित प्रत्येकजण खळखळून हसला. त्यावेळी फडणवीसांनी मात्र थेट डोक्यावर हात मारून घेतला.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.