Cm Eknath Shinde : 20 जुलैला शिंदे सरकारची कोर्टात अग्निपरीक्षा, मग मंत्रिमंडळ विस्तारासाठी 21 जुलैचा नवा मुहूर्त?

बुधवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख 21 जुलै मानली जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

Cm Eknath Shinde : 20 जुलैला शिंदे सरकारची कोर्टात अग्निपरीक्षा, मग मंत्रिमंडळ विस्तारासाठी 21 जुलैचा नवा मुहूर्त?
20 जुलैला शिंदे सरकारची कोर्टात अग्निपरीक्षा, मग मंत्रिमंडळ विस्तारासाठी 21 जुलैचा नवा मुहूर्त?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 7:31 AM

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार कशात अडलाय? असा सवाल रोज विरोधकांडून विचारण्यात येत असतानाच आता काही नवी समीकरणं समोर येत आहेत. महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर (President Election) आणि शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) करू शकते. अशाप्रकारे मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख 21 जुलै असल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होणार आहे. बुधवारी सुप्रीम कोर्टात शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या खटल्याची सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख 21 जुलै मानली जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वी, 18 जुलैपासून सुरू होणारे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन राज्य सरकारकडे सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे दोनच सदस्य असल्याने पुढे ढकलण्यात आले होते.

17 दिवसांनंतरही विस्तार नाही

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे यांनी 30 जून रोजी भाजपसह मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप किंवा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाकडून कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र दोघांचा शपथविधी होऊन 17 दिवस उलटले आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबावर विरोधक सातत्याने टीका करत आहेत.

खातेवाटपासाठी कधीचा मुहूर्त?

20 किंवा 21 जुलै रोजी मंत्र्यांना खात्यांचे वाटप केले जाण्याची अपेक्षा आहे आणि येत्या 10 दिवसांत पावसाळी अधिवेशन होणे अपेक्षित आहे, असे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रविवारी सांगितले. यामुळे मंत्र्यांना त्यांच्या नवीन पोर्टफोलिओबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल जेणेकरून ते सभागृहात प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.

सरकारकडे कमी वेळ

288 सदस्य असलेल्या सभागृहात भाजपचे 106 आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील 8 मंत्री आता शिंदे यांच्यात सामील झाले असून, त्यांचाही यात समावेश होण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी फक्त 18 महिने शिल्लक असल्याने पक्षाला मंत्री पदांच्या वाटणीमध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचेही सांगण्यात येत आहे. एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणीही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला. ऑक्टोबर 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचीही आचारसंहिता असल्याने विकासकामांसाठी मंत्र्यांना फारच कमी वेळ मिळणार आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असताना शिंदे गटातील काही आमदारांनी साधा शपथविधी सोहळा घेण्याची मागणी केली आहे, तर काहींनी विधानभवन संकुलात जाहीर शपथविधी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.