BJP : बुलढाणा आणि अमरावतीच्या जागांवर भाजपाचा दावा, मग शिंदे गट जाणार कुठे ?

भाजपाच्या प्रदेशाध्यपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात कमळ फुलवण्याचे स्वप्न बाळगून आहेत. राज्यातील केवळ महापालिकाच नव्हेतर आगामी लोकसभा आणि विधानसभेतही भाजपाचाच डंका असणार असा विश्वास व्यक्त करीत आहेत. मग आगामी काळात भाजपा आणि शिंदे गट खरोखरच एकत्र लढणार की नाहीत..! लढले तरी नेमक्या शिंदे गटाला जागा किती? शिवाय ज्या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडुण आला त्या सर्व जागा शिंदे गटाला सोडल्या जाणार की नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

BJP : बुलढाणा आणि अमरावतीच्या जागांवर भाजपाचा दावा, मग शिंदे गट जाणार कुठे ?
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 9:41 PM

नागपूर : दहीहंडीच्या उत्सवात यंदा खऱ्या अर्थाने (Maharashtra Politics) राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या उत्सवात प्रत्येक राजकीय पक्षाने स्वत:ची रणनिती आणि पुढील धोरणे काय आहेत स्पष्टच केले आहे. आगामी काळात राज्यात (Municipal Election) महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे भाजपाने केवळ मुंबईवरच लक्ष केंद्रीत केले असे नाहीतर विदर्भातील अनेक जागांवरही भाजपाची नजर राहणार आहे. शिवाय भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड झाल्यापासून सबंध राज्यात भाजपाचे कमळ फुलणार असा दावा केला जात आहे. त्यानुसारच बुलढाणा आणि अमरावतीमध्ये त्यांनी केलेल्या विधानाने शिंदे गटाची डोकेदुखी वाढत आहे. त्यांनी अमरावती आणि भाजप या दोन्ही ठिकाणी (BJP Party) भाजपचाच खासदार असणार असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपाच्या गोठात उत्साह संचारला असला तरी शिंदे गटाचे काय होणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. कारण बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे नेतृ्त्व हे प्रतापराव जाधव करीत आहेत जे शिवसेनेतून शिंदे गटात आले आहेत. त्यामुळे भविष्यात शिंदे गट आणि भाजपा हे एकत्र लढले तरी जागांचा विषय कसा मिटणार हे पहावे लागणार आहे.

प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचे अर्थ अनेक

भाजपाच्या प्रदेशाध्यपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागल्यापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात कमळ फुलवण्याचे स्वप्न बाळगून आहेत. राज्यातील केवळ महापालिकाच नव्हेतर आगामी लोकसभा आणि विधानसभेतही भाजपाचाच डंका असणार असा विश्वास व्यक्त करीत आहेत. मग आगामी काळात भाजपा आणि शिंदे गट खरोखरच एकत्र लढणार की नाहीत..! लढले तरी नेमक्या शिंदे गटाला जागा किती? शिवाय ज्या मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडुण आला त्या सर्व जागा शिंदे गटाला सोडल्या जाणार की नाहीत असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. कारण ज्या बुलढाणा लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत तिथे देखील आगामी खासदार हा भाजपचाच असणार असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे प्रतापराव जाधवांचे काय असा प्रश्न आहे.

नेमके काय म्हणावे बावनकुळे?

प्रदेशाध्यपदी वर्णी लागल्यापासून बावनकुळे हे राज्यातील विविध भागात दौरे करीत आहेत. सोमवारी ते दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने अमरावती आणि बुलढाणा येथे दाखल झाले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात मजबूत करायचे असतील तर अमरावती आणि बुलढाणा या मतदार संघात खासदार आणि आमदारही भाजपचाच असणार हे ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे या मतदार संघात शिंदे गटाचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा

https://www.youtube.com/shorts/jo8kX829Xos

शिंदे गटाकडूनही इशारा

चंद्रशेखर बावनकुळे यांना तसे म्हणायचे नसेल, कदाचित त्यांना शिवसेना आणि भाजपचा उमेदवार असे म्हणायचे असेल असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. मात्र, भाजपाचा असाच हेतू असेल तर यापुढे अशी विधाने सहन केली जाणार नाहीत. याबाबत वरिष्ठांना देखील सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आणि खासदार असेल त्या ठिकाणी विचार करावाच लागेल असे विधान आ. संजय गायकवाड यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.