BJP | महाराष्ट्रानंतर भाजपाची स्वारी दक्षिणेकडे! तेलंगणातील हैदराबादेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, महत्त्वाचे 10 मुद्दे कोणते?

विशेष म्हणजे भाजपने यावेळी एका प्रदर्शनाचंही आयोजन केलं आहे. यात तेलंगणाची संस्कृती, हस्तशिल्प, निजाम राजवटीविरोधात तेलंगणा मुक्ती लढा आणि तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळवून देण्यात भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.

BJP | महाराष्ट्रानंतर भाजपाची स्वारी दक्षिणेकडे! तेलंगणातील हैदराबादेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक,  महत्त्वाचे 10 मुद्दे कोणते?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 1:59 PM

मुंबईः महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra politics) कमालीची उलथापलथ केल्यानंतर भाजपने आपले लक्ष आता दक्षिण भारतावर केंद्रित केले आहे. तेलंगणातील (Telangana) हैदराबाद शहरात शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणितीची बैठक (BJP Meeting) सुरु झाली आहे. ही बैठक दोन दिवस चालेल. तेलंगणातील भाजपचं पाठबळ वाढवण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वाची रणनीती आखली जाऊ शकते. भाजपने मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही आक्रमक टीका केली आहे. तेलंगणातील सरकारचंही आता काउंटडाऊन सुरु झाल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. भाजपचे महासचिव तरुण चुग यांनी एका पत्रकार परिषदेत राव यांच्यावर टीका केली होती. 3000 दिवसांपेक्षा जास्त कार्यकाळ झालेल्या राव यांनी 30 तासही आपल्या कार्यालयात काम केलं नाही. त्यांनी केवळ ऐशोआराम, घराणेशाहीला खतपाणी घालण्यासाठी सत्तेचा वापर केला. तसेच राज्यनिर्मितीसाठी त्याग करणाऱ्या लोकांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुण चुग यांनी केला आहे. आता तेलंगणा काबीज करण्यासाठी भाजपने काय व्युहरचना आखली आहे, हे 10 प्रमुख मुद्द्यांतून पाहू…

  1. भाजपने तेलंगणा राज्यातील 119 विधानसभा मतदार संघात आपल्या नेत्यांना ग्राऊंड लेवलची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पाठवले आहे. कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर 3 जुलैरोजी एक सार्वजनिक सभा आयोजित केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करतील.
  2. भाजप केंद्रात मजबूत स्थितीत आहे. तसेच 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये संख्याबळावर मित्र पक्षांसोबत सत्तेत आहे. मात्र अजूनही काही राज्यांमध्ये भाजप कमकुवत असल्यामुळे याच राज्यातील संघटनात्मक ताकद अधिक बळकट करण्यावर भर दिला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
  3.  तेलंगणासहित दक्षिण भारतातील राज्यांवरील पकड मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन जुलै रोजी हैदराबादेत जाहीर सभा घेणार आहेत. स्थानिक संस्कृती आणि परंपरा या विषय़ावर मोदी सभेत बोलतील.
  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला तेलंगणातील 35,000 पेक्षा जास्त बूथवरील भाजप कार्यकर्ते सहभागी होतील. 18 वर्षानंतर येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. भाजपमधील निर्णय घेणारी ही प्रमुख शाखा आहे.
  5.  2024 मधील लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून या बैठकीत काही महत्त्वाची रणनीती आखली जाईल. दक्षिणेतील राज्ये, विशेषतः तेलंगणावर भाजपाचे लक्ष असेल.<

  6.  हैदराबाद कन्व्हेंशन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यात देशभरातील 350 सदस्य आहेत. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या अजेंड्यावर काल संध्याकाळीच पक्षातील महासचिवांशी चर्चा केली.
  7.  या बैठकीत पक्षाद्वारे दोन प्रस्ताव पारीत होऊ शकतात. तेलंगणाचे भाजपचे प्रभारी तरुण चूग म्हणाले, मोदी राष्ट्रीय कार्यकारीणीच्या प्रत्येक सत्रावर लक्ष ठेवून असतील.
  8.  हायटेक सिटी जवळील हैदराबाद कन्व्हेंशन सेंटर परिसरात आज या बैठकीनिमित्त नेत्यांचे पोस्टर आणि बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. यात तेलंगणातील सांस्कृतिक वारशांच्याही प्रतिमा आहेत. यातून जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जातोय.
  9.  तेलंगणात लागलेल्या बहुतांश बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि प्रदेश अध्यक्ष बी संजय कुमार यांचे फोटो आहेत. काहींमध्ये भाजपच्या केंद्रसरकारच्या योजनांचे यश वर्णन केले आहे. शहरातील चौका-चौकात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे कटआउट लावण्यात आले आहेत.
  10.  विशेष म्हणजे भाजपने यावेळी एका प्रदर्शनाचंही आयोजन केलं आहे. यात तेलंगणाची संस्कृती, हस्तशिल्प, निजाम राजवटीविरोधात तेलंगणा मुक्ती लढा आणि तेलंगणाला राज्याचा दर्जा मिळवून देण्यात भाजपच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.