Rani Mukherjee | राणी मुखर्जीच्या होकारासाठी यश चोप्रांनी तिच्या आई-वडिलांनाच केले होते लॉक, हा किस्सा माहीत आहे का ?
राणी मुखर्जी ही अतिशय सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहे यात काहीच वाद नाही. तिचं निखळ हास्य लोकांच्या मनाचा ठाव घेतं आणि खणखणीत अभिनय त्यांना खुर्चीशी खिळवून ठेवतो. तिच्या पर्सनल लाइफमधील एक किस्सा तिने शेअर केला होता, जो वाचून तुम्हीही हैराण व्हाल.
1 / 5
राणी मुखर्जीने हिंदी चित्रपटसृष्टीत तिच्या नावाचा ठसा उमटवला आहे. तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये शानदार अभिनयही केला आहे. मात्र ाज आपण तिच्या त्या चित्रपटाचा किस्सा जाणून घेणार आहोत, ज्यासाठी प्रख्यात दिग्दर्शक यश चोप्रा यांनी तिच्या आई-वडिलांनाच लॉक करून ठेवले होते.
2 / 5
हो, हे खरं आहे. हा चित्रपट होता ‘साथिया’.. राणी त्यामध्ये काम करण्यास फारशी उत्सुक नव्हती, पण तिने या चित्रपटात काम करावेच यासाठी यश चोप्रा अतिशय आग्रही होते. याबद्दल ‘बंटी और बबली 2’ च्या प्रमोशनवेळेस राणीने हा किस्सा सांगितला होता.
3 / 5
खरंतर त्यावेळी राणीचा ‘मुझसे दोस्ती करोगी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला अन धाडकन आपटलाही. हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे राणीचं करीअर संपलं, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. तेवढ्यात तिला ‘साथिया’ चित्रपटाची ऑफर देण्यात आली. पण तेव्हा राणी चित्रपटांची निवड अतिशय काळजीपूर्वक करत होती, त्यामुळे तिला साथियामध्ये काम करण्यात रस नव्हता.
4 / 5
त्यानंतर राणीचा नकार कळवण्यासाठी तिचे आई-वडील यश चोप्रा यांच्या ऑफीसमध्ये गेले होते. मात्र तेव्हाच यश चोप्रा यांनी तातडीने राणीला फोन लावला आणि हा चित्रपट नाकारून तू मोठी चूक करत आहेस, असे सांगितले. तेव्हाही राणी तयार झाली नाही. अखेर यश चोप्रा यांनी तिला ब्लॅकमेल केले. तू जोपर्यंत ‘साथिया’ चित्रपटात काम करण्यास होकार देत नाहीस, तोपर्यंत मी तुझ्या आई-बाबांना ऑफीसच्या बाहेर जाऊ देणार नाही, असे सांगत त्यांना तिथेच बसवून ठेवले.
5 / 5
अखेर राणीने ‘साथिया’ करण्यास होकार दिला. त्यामध्ये तिच्यासोबत अभिनेता विवेक ओबेरॉय याची मुख्य भूमिका होती. राणीची भीती खोटी ठरली आणि ‘साथिया’ जबरदस्त हिट ठरला. त्याला 6 फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.