Isha Ambani | कोण आहेत ईशा अंबानी यांच्या सासूबाई? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत केलंय काम

| Updated on: Aug 08, 2023 | 12:35 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांनी १२ डिसेंबर २०१८ मध्ये उद्योजक आनंद पिरामल यांच्यासोबत लग्न केलं. अंबानी कुटुंबियांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. तर आता जाणून घेवू ईशा अंबानी यांच्या सासूबाई स्वाती पिरामल यांच्याबद्दल. स्वाती पिरामल यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत देखील काम केलं आहे.

1 / 5
देशातील प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ईशा कायम त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. ईशा अंबानी यांचे सासू - सासरे देखील देशातील श्रीमंत उद्योजकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. ईशा अंबानी यांच्या सासूबाईंचं नाव स्वाती पिरामल आहे.

2 / 5
स्वाती पिरामल २०१० ते २०१४ पर्यंत भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वैज्ञानिक सल्लागार परिषद आणि पंतप्रधानांच्या व्यापार परिषदेच्या सदस्या होत्या. स्वाती पिरामल यांनी १९८०  मध्ये मुंबई विद्यापीठातून एमबीबीएसची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून पदव्युत्तर पदवी घेतली.

3 / 5
स्वाती पिरामल यांच्या खांद्यावर  एंटरप्रायजेस लिमिटेड कंपनीच्या व्हाईस चेअरपर्सनची जबाबदारी आहे. याशिवाय त्या मुंबईतील गोपालकृष्ण पिरामल हॉस्पिटलच्या संस्थापक आहेत.

4 / 5
स्वाती पिरामल यांना २०१५ साली तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.  स्वाती पिरामल यांनी  त्यांच्या सामाजिक सेवा आणि सार्वजनिक आरोग्याबाबत ग्रामीण भागात जनजागृती केली.

5 / 5
 स्वाती पिरामल यांची मुलगी नंदिनी पिरामल यांना देखील यंग ग्लोबल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्वाती पिरामल यांचं  नाव जगातील २५ पॉवरफुल महिलांच्या यादीत ८ वेळा सामील झालं आहे.