World Cup 2023 मध्ये टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू जास्त धावा काढणार, सेहवाग याची मोठी भविष्यवाणी!
या वर्ल्ड कपमध्ये ओपनर सर्वाधिक धावा करतील असं म्हणत टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने टीम इंडियाच्या खेळाडूचं नाव घेतलं आहे.
![World Cup 2023 मध्ये टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जास्त धावा काढणार, सेहवाग याची मोठी भविष्यवाणी! World Cup 2023 मध्ये टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जास्त धावा काढणार, सेहवाग याची मोठी भविष्यवाणी!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/06/04175600/virender-sehwag-5.jpg?w=1280)
virender sehwag Image Credit source: PTI
- Rohit-Sharma टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी केलीये.
- आयसीसीने वीरेंद्र सेहवागचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये सेहवागने या वर्ल्डकपमध्ये कोणता खेळाडू सर्वाधिक धावा काढणार हे सांगितलं आहे.
- 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरूवात होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे.
- 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माने टीम इंडियाकडून सर्वाधिक शतके केली होतीत. मात्र सेमी फायनल सामन्यामध्ये तो लवकर बाद झालेला.
- या वर्ल्ड कपमध्ये ओपनर सर्वाधिक धावा करतील. सर्वाधिक धावा करणारा करणाऱ्या खेळाडूंमध्ये इतरही नावं आहेत पण मी रोहित शर्माचं नाव घेईल, असं सेहवाग म्हणाला.
Non Stop LIVE Update