थेट सरपंच निवड म्हणजे काय?
सदस्यांमधून सरपंच निवडायचा असेल तर जितके सदस्य ग्रामपंचायतीत विजयी झालेत त्यातूनच सर्वांच्या संमतीने एकाला सरपंच बनवलं जातं. यावेळी जनता आपला सरपंच नेमका कोण असावा हे ठरवू शकत नाही. सदस्यच ठरवतात की सरपंच नेमका कोण असेल.
राज्य पातळीवर मुख्यमंत्रीपद हे जसं सर्वोच्च असतं तसंच खेडेगावामध्ये सरपंचपद हे सर्वोच्च असतं. छोट्या खेडेगावाचा कारभार हा ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. आता थेट जनतेतून सरपंच निवडणं(Sarpanch Election) म्हणजे जनताच सरपंच पदासाठी उभं असलेल्या उमेदवारांनाच मतदान करते. ग्रामपंचायतीत कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 17 सदस्य गरजेचे असतात. आता या सदस्यांना जनता मतदान करून निवडतात. तसंच आता सरपंच निवडण्यासाठीही जनतेला मतदान कराव लागणार आहे. त्यासाठी मतदारांना 2 वेळा मतदान करावं लागेल. एक आपल्या भागातील सदस्य निवडीसाठी आणि दुसरं सरपंच निवडीसाठी.
मग आता थेट जनतेतून सरपंच निवड आणि सदस्यांमधून निवड होणं यातला फरक काय आहे हे जाणून घेऊयात
सदस्यांमधून सरपंच निवडायचा असेल तर जितके सदस्य ग्रामपंचायतीत विजयी झालेत त्यातूनच सर्वांच्या संमतीने एकाला सरपंच बनवलं जातं. यावेळी जनता आपला सरपंच नेमका कोण असावा हे ठरवू शकत नाही. सदस्यच ठरवतात की सरपंच नेमका कोण असेल.
सरपंच पदाची निवडणूक ही शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशा पक्षांच्या चिन्हांवर लढवता येत नाही. गावात पॅनेल्स तयार केले जातात. एका पॅनेलविरोधात दुसरं पॅनेल रिंगणात उभं असतं. यात ग्रामविकास पॅनेल, आदर्श ग्रामविकास पॅनेल अशी आपल्या पसंतीची नावं देऊन गट तयार केले जातात. मग एखाद्या गावात असे दोन किंवा तीन पॅनेल असू शकतात. पॅनेल ठरलं की मग कोणता उमेदवार कुठे उभा करायचं हे ठरतं. यासोबतच अपक्ष म्हणूनही उमेदवाराला उभं राहता येतं. अशाप्रकारे ग्रामपंचायतीत निवडणूक लढवली जाते
आता थेट जनतेतून सरपंच निवडीला नेमका विरोध का?
जर एखाद्या पॅनेलचे जास्त सदस्य विजयी झाले आणि सरपंच हा दुसऱ्या पॅनेलचा जिंकून आला तर यावेळी मतप्रवाह अधिक असतो.
सरपंचाने घेतलेल्या निर्णयाला सदस्य पाठिंबा देतीलच याची शक्यता कमी असते. याचा थेट परिणाम गावच्या विकासवर होऊ शकतो
सरपंच निवड सदस्यांनी केल्यास काय होईल?
सरपंच निवड सदस्यांमधून झाल्यास घोडेबाजाराची शक्यता असते.
सदस्यांमधून जर सरपंच निवडून आला तर त्याला इतर सदस्यांचा पाठिंबा असतो