Luna 25 Crash | लूना-25 मिशन कसं फेल झालं? काय चुकलं? लँडिंगआधी चांद्रयान-3 साठी काय संदेश?

Luna 25 Crash | भारताच्या चांद्रयान-3 आधी चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज असलेल्या लूना-25 च शनिवारी क्रॅश लँडिंग झालं. नेमकी काय चूक झाली? हे मिशन का फेल झालं? त्या बद्दल समजून घेऊया.

Luna 25 Crash | लूना-25 मिशन कसं फेल झालं? काय चुकलं? लँडिंगआधी चांद्रयान-3 साठी काय संदेश?
chandrayaan 3 -Luna-25
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:12 AM

मॉस्को : सध्या सगळ्या देशवासियांच लक्ष चंद्राकडे लागलं आहे. भारताच चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज आहे. इस्रोने लँडिंगची तारीख आणि वेळ जाहीर केला आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजता भारताच चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवण्याआधी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भारताप्रमाणे रशियाच लूना-25 चंद्राच्या कक्षेत भ्रमण करत होतं, आज हे यान चंद्रावर लँड होणार होतं. मात्र त्याआधी हे यान दुर्घटनाग्रस्त झालं. लूना-25 चंद्राच्या पुष्ठभागावर कोसळून क्रॅश झालं.

चांद्रयान-3 नंतर मिशन लूना-25 ची सुरुवात झाली होती. पण रशियाच हे मिशन अपूर्ण राहिलं. रशियाच्या लूना-25 बरोबर काय झालं? हे मिशन का फेल झांल? त्या बद्दल समजून घेऊया. रशियाच लूना-25 सुद्धा चांद्रयान-3 प्रमाणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणार होतं.

रशियाच्या लँडरच वजन किती होतं?

मागच्या पाच दशकातील रशियाची ही पहिली चांद्र मोहिम होती. त्यासाठी ते उत्साहित होते. रशियाची स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉसने रविवारी सांगितलं की, “शनिवारी दुपारी 2.57 मिनिटांनी त्यांचा लूना-25 बरोबर संपर्क तुटला. पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचे वारंवार प्रयत्न करण्यात आले. पण त्यात यश मिळालं नाही” जवळपास 800 किलो वजनाचा लँडर चंद्राच्या पुष्ठभागावर आदळला.

नेमकं काय चुकलं?

रॉसकॉसमॉसने सांगितलं की, “लूना-25 चंद्राच्या खूप जवळ पोहोचलं होतं, त्यावेळी लँडरने निर्धारित कक्षा सोडून दुसऱ्याच कक्षेत प्रवेश केला. या दरम्यान आमचा संपर्क तुटला व चंद्रावर पुष्ठभागावर आदळून क्रॅश लँडिंग झालं” आता मिशन फेल कशामुळे झालं? त्याचा शोध घेण्यासाठी रशियन एजन्सीने कमिशनची स्थापना केली आहे. ही समिती आपला रिपोर्ट् सादर करेल.

गोष्टी हाताबाहेर गेल्या

लँडिंग ऑपरेशनच्या दरम्यान असं काही घडलं की, ज्यामुळे गोष्टी अचानक बदलल्या असं रशियन स्पेस एजन्सीने सांगितलं. त्यामुळे शेवटच मॅन्यूव्हर पूर्ण होऊ शकलं नाही आणि गोष्टी हाताबाहेर गेल्या. भारताच दुसरं चांद्रयान-2 मिशन 2019 मध्ये लाँच झालं होतं. त्यावेळी तत्कालिन इस्रो प्रमुखांनी एक गोष्ट सांगितली होती. त्याचा अर्थ आता उलगडतोय. इस्रोला काय काळजी घ्यावी लागेल

लँडिंगआधी शेवटची 15 मिनिट एका टेरर सारखी असतात. हे टप्पा पार करणं सर्वात अवघड असतं. अनेकदा गोष्टी तुमच्या हातात नसतात. इस्रोला याच शेवटच्या काही मिनिटात जास्त काळजी घ्यावी लागेल. चांद्रयान-3 ला हॉरिझॉनटल मोडमधून वरटिकल मोडमध्ये आणाव लागेल. म्हणजे सध्या अंडाकार कक्षेत भ्रमण करणाऱ्या चांद्रयान-3 ला सरळ रेषेत आणाव लागेल.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.