Rajya sabha election:कोण आहेत सुभाषचंद्र गोयल ज्यांना राजस्थानात फक्त 30 मतं मिळाली, धनंजय महाडिकांसारखं मैदानात उतरवण्याची भाजपची खेळी अयशस्वी?

राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसने दोन उमेदवारांचे बळ असतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला होता. तर भाजपाने याला प्रत्युत्तर म्हणून सुभाषचंद्रा गोयल यांना समर्थन दिले होते. भाजपाच्या अतिरिक्त मतांऐवजी अपक्षांची आणि छोट्या पक्षांची मते सुभाषचंद्रांना मिळतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चतुराीने संख्याबळ गोळा गेले

Rajya sabha election:कोण आहेत सुभाषचंद्र गोयल ज्यांना राजस्थानात फक्त 30 मतं मिळाली, धनंजय महाडिकांसारखं मैदानात उतरवण्याची भाजपची खेळी अयशस्वी?
Subhashchandra in electionImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 9:14 PM

नवी दिल्ली – प्रसिद्ध उद्योगपती सुभाषचंद्रा गोयल (Subhash Chandra Goyal)यांना राजस्थानमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya sabha election) पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपा समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून ते रिंगणात उतरले होते. त्यांना विजयासाठीची मते मिळवता आली नाहीत. त्यांना ४१ मतांची आवश्यकता होती. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसच्या रणजीत सुरजेवाला यांना ४३, मुकुल वासनिक यांना ४२ तर प्रमोद तिवारी यांना ४१ मते मिळली. भाजपाच्या घनश्याम तिवारी यांना ४३ मते मिळाली. भाजपाला एकूण ७४ मते मिळाली, त्यातील ३० मते सुभाषचंद्रांना मिळाली. हनुमान बेनिवाल यांच्या पार्टीची ३ मते सुभाषचंद्रा यांना मिळाली होती. मात्र काँग्रेसने भाजपाची दोन मते पळवल्याने सुभाष चंद्रा यांचे नुकसान झाले. बेनिवाल यांच्या ३ मतांसहही सुभाषचंद्रा यांना ८ मते हवी होती. त्यांच्याकडे ३३ मते असतानाही, त्यांच्या वाट्याला केवळ ३०च मते (only 30 votes)आली आहेत. काँग्रेसला १०८ त्यांच्या मतांशिवाय १८ मते जास्त मिळाली आहेत. हा सुभाषचंद्र गोयल यांना मोठा धक्का मानण्यात येतो आहे.

धनंजय महाडिक सारखीच भाजपाची होती खेळी

राजस्थानात सत्तेत असलेल्या काँग्रेसने दोन उमेदवारांचे बळ असतानाही तिसरा उमेदवार रिंगणात उतरवला होता. तर भाजपाने याला प्रत्युत्तर म्हणून सुभाषचंद्रा गोयल यांना समर्थन दिले होते. भाजपाच्या अतिरिक्त मतांऐवजी अपक्षांची आणि छोट्या पक्षांची मते सुभाषचंद्रांना मिळतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी चतुराीने संख्याबळ गोळा गेले आणि तिसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय घडवून आणला. सुभाषचंद्रांसारखाच प्रयोग, महाराष्ट्रात भाजपाने धनंजय महाडिक यांच्याबाबतही केला आहे.

२०१६ साली हरियाणातून आले होते निवडून

राज्यसभेवर जाण्याचा सुभाषचंद्रा हे दुसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याच्या प्रयत्नात होते. यापूर्वी २०१६ साली ते हरियाणातून राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी काँग्रेसकडे संख्याबळ असतानाही सुभाषचंद्रा यांचा विजय झाला होता. या निवडणुकीत कट रचत पेन बदलण्यात आला. अपेक्षित असलेल्या रंगाच्या ऐवजी दुसरा रंग असलेला पेन ठेवण्यात आला. यामुळे काँग्रेसची १६ मते बाद ठरली. त्यामुळे भाजपा समर्थित सुभाषचंद्रा यांचा विजय झाला. पेनची शाई बदलण्याचे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, मात्र अद्यापही त्यावर निर्णय झालेला नाही.

हे सुद्धा वाचा

मूळचे राजस्थानचे असलेले सुभाषचंद्रा हरियाणात स्थायिक

सुभाष चंद्रा यांचा जन्म हरियणातील हिसार जिल्ह्यातील आहे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणात झाले, त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनमधून शिक्षण पूर्म केल्यानंतर त्यांनी भारतात परतल्यानंतर व्यवसाय सुरु केला. १९९२ साली त्यांनी पहिल्यांदा खासगी भारतीय उपग्रह टेलिव्हिजनची सुरुवात केली. झी मीडिया हे देशातील पहिले केबल टीव्ही चॅनेल आहे. त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्रा होते. सुभाषचंद्रा यांचा यांच्या परिवाराचे मूळ गाव राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील फतेहपूर आहे. मात्र त्यांच्या आधीच्या पिढ्या व्यवसाय़ासाठी फतेहपूर सोडून हरियाणाच्या हिसारमध्ये जाऊन स्थायिक झाल्या.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.