Loksabha Election 2024: नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या नितीश कुमार यांचा काय प्लॅन?, काँग्रेस, ममतांसह 13 नेत्यांना एकत्र आणणार? 500 जागा लढणार?

नितीश कुमार यांचा दिल्ली दौरा जर यशस्वी झाला आणि सर्व विरोधक एकजूट होण्यास तयार झाले तर भाजपाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 500 पेक्षा जास्त जागी महाआघाडीची भाजपासोबत थेट लढत होण्याची शक्यता आहे. नितीश यांच्या संपर्कात असलेले पक्ष हे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आहेत.

Loksabha Election 2024: नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या नितीश कुमार यांचा काय प्लॅन?, काँग्रेस, ममतांसह 13 नेत्यांना एकत्र आणणार? 500 जागा लढणार?
नितीशकुमारांचा काय प्लॅनImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 9:10 PM

नवी दिल्ली – बिहारमधून भाजपाला सत्तेतून हटवल्यानंतर, आता नितीश कुमार (Nitish Kumar)यांचे लक्ष्य आहे लोकसभा निवडणूक 2024 . नितीश कुमार यांनी मिशन 2024 ची सुरुवात दिल्लीपासून केली आहे. नितीश कुमार यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात त्यांनी 5 मोठ्या नेत्यांची भेट घेतली आहे. यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi), कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटकातील जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी, सीपीआयएमचे सरचिटणीस सीताराम येच्युरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांची पार्टी तृणमूल काँग्रेस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाच्या नेतयांशीही नितीश यांची भेट प्रस्तावित आहे. नितीश यांचा दिल्ली दौरा हा विरोधकांच्या एकजूटीसाठी असल्याचे राजकीय वर्तुळात मानण्यात येते आहे.

नितीश यांचे प्रयत्न यशस्वी झाले तर..

नितीशकुमार यांचे प्रयत्न यशस्वी झाले तर 2024 च्या निवडणुकांपूर्वी भाजपाच्या विरोधात काँग्रेससह प्रादेशिक पक्षही एकत्र येण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांचे महाआघाडीचे प्रयत्न पहिल्यांदाच नाहीयेत, 2015 सालीही त्यांनी हा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी त्याला यश आले नव्हते. नितीश कुमार यांच्या या प्रयत्नांचा लोकसभा निवडमुकांवर काय परिणाम होईल हे जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

500 पेक्षा जास्त जागी होणार थेट लढाई

नितीश कुमार यांचा दिल्ली दौरा जर यशस्वी झाला आणि सर्व विरोधक एकजूट होण्यास तयार झाले तर भाजपाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 500 पेक्षा जास्त जागी महाआघाडीची भाजपासोबत थेट लढत होण्याची शक्यता आहे. नितीश यांच्या संपर्कात असलेले पक्ष हे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आहेत.

नितीश यांची आघाडी यशस्वी झाली तर ग्रामीण भारतात भाजपाला फटका

देशाच्या ग्रामीण भागात लोकसभेच्या 353 जागा आहेत. यात 2019 साली भाजपाला 207 जागांवर विजय मिळवता आला होता. तर काँग्रेस आणि इतर पक्षांना 126 जागा मिळाल्या होत्या. नितीशकुमार आणि महाआघाडीचा फोकस याच जागांवर असल्याचे सांगण्यात येते आहे. या जागांवर भाजपाची स्थिती कमकुवत आहे.

2009 साली भाजपा या ग्रामीण भागात केवळ 77 जागी निवडून आली हती. 2014 साली हा आकडा 190 झाला, तर 2019 साली हा आकडा 207 वर पोहचला.

समी अर्बन म्हणजेच निमशहरी भागांचा विचार केला तर 108 जागांपैकी भाजपाला 2009 मध्ये 20 , 2014 मध्ये 53 आणि 2019 साली 58 जागा मिळाल्या होत्या.

शहरी भाग म्हणजेच अर्बन भागाचा विचार केल्यास, 82 जांगापेकी भाजपाला 2009 मध्ये 20, तर 2014 आणि 2019 मध्ये 40-40 जागा मिळाल्या होत्या.

कोणत्या नेत्यांचा किती जागांवर परिणाम

1. राहुल गांधी – देशभरात, 200 जागा 2. सीताराम येच्युरी – केरळ, प. बंगाल, 62 जागा 3. शरद पवार, उद्धव ठाकरे – महाराष्ट्र, 48 जागा 4. ममता बॅनर्जी- प. बंगाल, 42 जागा 5. एचडी कुमारस्वामी-कर्नाटक, 28 जागा 6. जगनमोहन रेड्डी- आंध्रप्रदेश, 25 जागा 7. नवीन पटनायक – ओडिशा, 21 जागा 8. अरविंद केजरीवाल – दिल्ली, पंजाब- 20 जागा 9. के चंद्रशेखर राव- तेलंगणा, 17 जागा 10. ओमप्रकाश चौटाला- हरियाणा, 10 जागा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.