UPSC Result 2022 : शेतकऱ्याचा मुलगा आयएएस, इंजिनिअरची नोकरी सोडून मिळवली यूपीएससीत 17वी रँक

UPSC Result 2022 success story : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. या परीक्षेत असामान्य कामगिरी करत अनेक जणांनी यश मिळवले. यूपीएससीत १७ वी रँक मिळवलेल्या अविनाश कुमारचे वडील अजय कुमार सिंह शेतकरी आहेत.

UPSC Result 2022 : शेतकऱ्याचा मुलगा आयएएस, इंजिनिअरची नोकरी सोडून मिळवली यूपीएससीत 17वी रँक
avinash kumar upsc topper
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 11:28 AM

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result UPSC) जाहीर करण्यात आला आहे. यूपीएससीत परीक्षेत अनेकांनी असामान्य कामगिरी करत यश मिळवले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मंगेश खिलारी याच्या वडिलांचे चहाचे दुकान आहे तर आई विडी कामगार आहे. दुसरीकडे १७ वी रँक मिळवलेला अविनाश कुमार याचे वडील अजय कुमार सिंह शेतकरी आहेत. अविनाश कुमारला सलग दोन वेळा यूपीएससीत अपयश आले. परंतु त्याने हार न मारता जिद्द दाखवली अन् तिसऱ्या प्रयत्नात १७ वी रँक मिळवली.

वडील शेतकरी

बिहारमधील अररिया जिल्ह्यातील बथनाहा तालुक्यातील बघुआ गावात अविनाश कुमारचे वडील अजय सिंह शेतकरी आहेत. त्याची आई प्रतिमा देवी गृहिणी आहे. अविनाशला 17 वा क्रमांक मिळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे. अविनाशच्या यशाचा गावकऱ्यांना अभिमान आहे. अविनाश आणि त्याच्या कुटुंबीयांचे नातेवाईक अभिनंदन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

गावात झाले शिक्षण

10वी पर्यंत अविनाशने राणी सरस्वती विद्या मंदिरात केले. बारावीपर्यंतचे शिक्षण झारखंडमधील बोकारो येथील चिन्मय विद्यालयातून केले. बारावीत त्याला ९३.२ टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अविनाश जादवपूर विद्यापीठ कोलकाता पश्चिम बंगालमधून ९.६ सीजीपीए मिळवून यशस्वी झाला.

पश्चिम बंगालमध्ये नोकरी

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर अविनाशला पश्चिम बंगालच्या वीज प्रकल्पात नोकरीही मिळाली. परंतु त्याचे लक्ष फक्त सरकारी नोकरी नव्हती. त्यामुळे त्याने 11व्या महिन्यातच नोकरी सोडली आणि दिल्लीला जाऊन यूपीएससीची तयारी सुरू केली.

दोन वेळा अपयश

पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात अपयश आले. त्यात प्राथमिक परीक्षेतच निवड होऊ शकली नाही. मग तिसऱ्या प्रयत्नात संपूर्ण झोकून देऊन मेहनत केली आणि त्याचे फळ आज समोर आहे. देशसेवा हेच आपले एकमेव ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात समाजासाठी विशेष योगदान देऊ इच्छित असल्याचे त्यांनी सांगितले. माझी पोस्टिंग कुठेही होईल, त्या भागातील मूलभूत समस्या सोडवणे याला प्रथम प्राधान्य असेल, असे अविनाश याने म्हटले आहे.

हे ही वाचा

UPSC Result 2022 : चहा विक्रेत्याचा मुलगा यूपीएससीत टॉपर, विडा कामगाराचा मुलगा होणार IAS

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.