योगींच्या राज्यात लादेनचा फोटो, फोटो लावणाऱ्या अधिकाऱ्याची हाकालपट्टी, निलंबनानंतरही अधिकाऱ्याने केला लादेनचा उदो उदो

आठवडाभरापूर्वी ओसामाचे छायाचित्र कार्यालयात लावले होते. मात्र त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच अहवाल मागवला असून अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे मुख्य अभियंता राकेश वर्मा यांनी सांगितले.

योगींच्या राज्यात लादेनचा फोटो, फोटो लावणाऱ्या अधिकाऱ्याची हाकालपट्टी, निलंबनानंतरही अधिकाऱ्याने केला लादेनचा उदो उदो
ओसामा बिन लादेनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 4:07 PM

फरुरखाबाद (उत्तर प्रदेश) : आपल्या देशात कोणी कसे रहावे काय करावे याची मुभा संविधान देतं. पण काय करू नये याचीही बंधने आहेतच. पण तरिही काही महाभाग आपल्याला जे करायचं नाही ते करतात आणि आपल्या पायावर दगड मारून घेतात. मात्र उत्तर प्रदेशमधील फरुरखाबाद (Farrukhabad in Uttar Pradesh) येथे एका सरकारी अधिकाऱ्याने आपल्या पायावर दगड मारून घेतला नाही तर आपला पाय त्या दगडावर मारून घेतला ज्यामुळे त्याचा पायच नाही तर नशीब ही फुटलं आहे. येथे एका सरकारी कार्यालयात (Government Office) अधिकाऱ्याने अल-कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावण्याचा पराक्रम केल्याचा समोर आला आहे. त्याच्या याच पराक्रमाची शिक्षा त्याला मिळाली असून त्या सरकारी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे, इतकेच नाही तर या अधिकाऱ्यांने लादेन (Osama Bin Laden) हा “जगातील सर्वोत्तम कनिष्ठ अभियंता” असल्याचे देखील म्हटले आहे. या प्रकरणात विद्युत विभागाच्या नवाबगंज उपविभागीय अधिकारी यांना बुधवारी निलंबित करण्यात आले आहे. त्याअधिकाऱ्याचे नाव रवींद्र कुमार गौतम आहे.

ओसामाला आपण आपला गुरू मानतो

उत्तर प्रदेशमधील फरुरखाबाद येथे विद्युत विभागाच्या नवाबगंज उपविभागीय अधिकारी याने ओसामा बिन लादेनचा फोटो आपल्या कार्यालयात लावला. इतकेच काय तर ओसामाला आपण आपला गुरू मानतो असेही तो सांगत होता. यामुळे रवींद्र कुमार गौतम याला निलंबित करण्यात आले आहे. यावर निलंबित अधिकारी गौतम म्हणाले, “मी ओसामा बिन लादेनला माझा गुरु मानतो. फोटो काढला तर दुसरी व्यवस्था करून पुन्हा टांगून देईन. तर प्रत्येकजण आपला आदर्श निवडण्यास स्वतंत्र आहे.

प्रतिष्ठित ओसामा बिन लादेन

दरम्यान फरुरखाबाद जिल्ह्यातील नवाबगंज येथील त्यांच्या कार्यालयाच्या वेटिंग रूममध्ये ओसामा बिन लादेनचा फोटो टांगण्यात आला होता. तसेच त्या फोटोत ‘प्रतिष्ठित ओसामा बिन लादेन’ असे लिहिले होते. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. ज्यामुळे उत्तर प्रदेश सरकारला प्रश्न विचारले जाऊ लागले. यामुळे गौतम याला निलंबित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

घटनेचा अहवाल राज्य सरकारला

फरुरखाबादचे जिल्हा दंडाधिकारी संजय कुमार सिंह यांनी या घटनेचा अहवाल राज्य सरकारला पाठवला होता. यानंतर दक्षिणाचल विद्युत वितरण निगम लिमिटेडचे ​​व्यवस्थापकीय संचालक अमित किशोर यांनी गौतमला निलंबित केले आणि त्यांच्या कृत्याने राज्याच्या विद्युत विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे, असे म्हणत त्याच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाईची शिफारस केली.

कन्नौज येथे बदली

दरम्यान ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावल्याप्रकरणी गौतम याचे निलंबन करण्यात आले आहे. कामावरून कमी करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी बदली वीज वितरण मंडळ कन्नौज येथे करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले. गौतमचे कृत्य सरकारी नोकर आचार नियम, 1958 च्या तरतुदींच्या विरोधात असल्याचेही व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले आहे.

कोणीही आक्षेप घेतला नाही

दरम्यान, राज्याच्या वीज विभागातील सूत्रांनी सांगितले की, एसडीओ गौतमने आठवडाभरापूर्वी ओसामाचे छायाचित्र कार्यालयात लावले होते. तेथे लिपिक, ऑपरेटर, दोन कनिष्ठ अभियंते आणि डझनभर लाईनमन काम करतात. तर अनेक जन कामानिमित्त येत असतात. मात्र यावर कोणीही आक्षेप घेतला नाही.

अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाई

दरम्यान, ओसामा बिन लादेनचा फोटो कार्यालयात लावल्याप्रकरणी गौतम याचे निलंबन करण्यात आले असले तरिही याची माहिती इतर कर्मचाऱ्यांना होती. आठवडाभरापूर्वी ओसामाचे छायाचित्र कार्यालयात लावले होते. मात्र त्यावर कोणत्याही कर्मचाऱ्यांने आक्षेप घेतला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच अहवाल मागवला असून अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाई केली जाईल असे मुख्य अभियंता राकेश वर्मा यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.