Raj Thackeray Ayodhya Visit : अयोध्येत राज ठाकरेंना रोखण्यासाठी 5 लाखांची फौज, साधू संताचाही विरोध, बृजभूषण यांचा दावा

भव्य रॅली काढत आणि सभा घेत राज ठाकरेंना विरोध दर्शवत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. मात्र अजूनही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आणि राज ठाकरेंना रोखण्यासाठी अयोध्येत पाच लाखांची फौज तयार असल्याचा दावा ते करत आहेत.

Raj Thackeray Ayodhya Visit : अयोध्येत राज ठाकरेंना रोखण्यासाठी 5 लाखांची फौज, साधू संताचाही विरोध, बृजभूषण यांचा दावा
भाजप खासदाराची राज ठाकरेंवर टीकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 9:29 PM

अयोध्या : बृजभूषण सिंह (brijbhushan singh) हे खासदार जरी उत्तर प्रदेशातील असले तरी त्यांची चर्चा सध्या महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर होत आहे. ते रोज माध्यमांसमोर येत राज ठाकरेंना कडवं आव्हान देत आहेत. राज ठाकरेंचा (raj thackeray) अयोध्या दौरा (Ayodhya Visit) घोषित झाल्यापासून राज ठाकरेंना अयोध्ये पाऊल ठेऊ देणार नाही असा हट्टच ते पकडून बसले आहे. सुरूवातील राज ठाकरेंनी यांनी माफी मागवी तर त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार अन्यथा त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र तरीही यावर राज ठाकरे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने काही दिवसानंतर त्यांनी भूमिका बदलली. आता राज ठाकरेंनी माफी मागितली तरी त्यांना येऊ देणार नाही, कारण आता वेळ निघून गेली. आता माफी मागून यायचे असेल तर राज ठाकरे यांनी दौऱ्याची तारीख बदलावी अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यानंतर भव्य रॅली काढत आणि सभा घेत राज ठाकरेंना विरोध दर्शवत त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. भाजप नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. मात्र अजूनही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. आणि राज ठाकरेंना रोखण्यासाठी अयोध्येत पाच लाखांची फौज तयार असल्याचा दावा ते करत आहेत.

राज ठाकरेंना जागाही उरली नाही

पाच लाख लोख अयोध्येत राज ठाकरेंना अडवण्यासाठी दाखल होतील. तसेच राज ठाकरेंच्या येण्याला साधू संताचाही विरोध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी सांगितले की संपूर्ण आयोध्येतील हॉटेल आणि गेस्ट हाऊसचीबुकिंग झाली आहेत. आता कुठेही जागा रिकामी नाही अशी त्यामुळे राज ठाकरे यांना येणारी तारीख बदलावीच लागणार, असेही ते म्हणाले. तसेच 5 तारखेला लखनऊ आणि अयोध्येत 5 लाखापेक्षा जास्त लोक जमणार आहेत. साधू संतांनी निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत आयोध्यामध्ये पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

फडणवीसांच्या फोननंतरही काही होणार नाही

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरही खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीसांशी चांगले संबंध आहेत पण आता जर देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला तर काही होऊ शकत नाही वेळ निघून गेलेली आहे. तसेच खासदार लल्‍लू सिंह यांच्याबाबत ते म्हणाले, माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांना ओळखतो. मीडियाने त्यांना प्रश्न विचारला होता राज ठाकरे आले त्यांच्या स्वागत करणार का? त्यावर ते म्हणाले सर्वाचं स्वागत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.