Chandrayaan-3 Update | भारत चंद्रावर, पाकिस्तानची SUPARCO कुठे? जिन्नालँडमध्ये चांद्रयान-3 वरुन इतका गदर का?
Chandrayaan-3 Update | भारताच्या मून मिशनबद्दल पाकिस्तानात काय बोललं जातय? तिथे काय चर्चा आहे?. पाकिस्तानच्या SUPARCO स्पेस एजन्सीची स्थापना कधी झाली? आज पाकिस्तानी स्पेस एजन्सी कुठे आहे?
नवी दिल्ली : भारताच मून मिशन शेवटच्या टप्प्यात आहे. 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 च सॉफ्ट लँडिंग होणार आहे. मून मिशनच काऊंटडाऊन सुरु झालं आहे. सगळ्याच जगाची नजर भारताच्या चांद्रयान-3 वर आहे. कारण रशियाच लूना-25 चंद्रावर उतरण्याआधीच क्रॅश झालं. आता भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची शर्यत जिंकणार का? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. भारताचे शेजारी जिन्नालँड म्हणजे पाकिस्तानची नजर सुद्धा चांद्रयान 3 वर आहे. तिथे भारताच्या यशावर गदर सुरु आहे. पाकिस्तानी जनता आपल्या सरकारवर टीका करत आहे. पाकिस्तानमध्ये चांद्रयान-3 वरुन इतका गदर का सुरु आहे? ते जाणून घेऊया.
भारताच्या चांद्रयान-3 च चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यास ती एक ऐतिहासिक घटना असेल. भारताचा अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत समावेश होईल. चंद्रावर लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरेल.
पाकिस्तानात भारताच्या मून मिशनबद्दल काय चर्चा?
भारताच्या चांद्रयान-3 ची पाकिस्तानातही चर्चा आहे. भारताने अवकाश संशोधनात जो टप्पा गाठलाय, तिथपर्यंत पोहोचण पाकिस्तानला शक्य नाहीय. आर्थिक स्थिती खराब असलेल्या पाकिस्तानच भविष्य अंधकारात बुडालेलं आहे. पाकिस्तानी जनता मात्र भारताच्या चांद्रयान-3 चं भरभरुन कौतुक करतेय. त्याचवेळी तिथली जनता पाकिस्तानी राज्यकर्त्यांना नाव ठेवत आहे.
पाकिस्तानी नागरिक अलीने काय म्हटलं?
“भारताची टेक्नोलॉजी पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. आम्हाला इथे 25 वर्ष जुन्या पुस्तकांमधून शिकवल जातय. टेक्नोलॉजी दर आठवड्याला बदलते आहे. भारताच मिशन चांद्रयान फेल व्हाव, असा आपण विचार करु नये. उलट आपण त्यांच्या यशासाठी प्रार्थना केली पाहिजे. भारत फेल व्हावा असा विचार करुन नाही, तर आपल्याला स्वबळावर त्यांना हरवता आलं पाहिजे” अशी भावना पाकिस्तानी नागरिक अलीने व्यक्त केली.
पाकिस्तानच्या SUPARCO स्पेस एजन्सीची स्थापना कधी झाली?
भारताच्या आधी पाकिस्तानचा स्पेस कार्यक्रम सुरु झाला होता. 1961साली पाकिस्तानने SUPARCO स्पेस एजन्सीची स्थापना केली होती. 2022-23 मध्ये या एजन्सीच बजेट 739 कोटी रुपये आहे. पण पाकिस्तानच्या या संस्थेने अजूनपर्यंत एकही मिशन केलेलं नाही. तेच भारताने 1969 साली ISRO ची स्थापना केली. दोन अवकाश संशोधन संस्थांमधील फरक काय?
2022-23 मध्ये इस्रोच बजेट 10,530 कोटी रुपये आहे. सध्याच्या घडीला भारताच मिशन चांद्रयान-3 पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पाकिस्तानच्या अवकाश संशोधन संस्थेला स्वत:च अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. तेच भारताच्या इस्रोचा आज जगातील अव्वल अवकाश संशोधन संस्थांमध्ये समावेश होतो. इस्रोने सगळ्यांचा विश्वास जिंकला आहे. दुसरे देश आपले उपग्रह लॉन्च करण्यासाठी इस्रोकडे देतात.