आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आधी घरी केला Video Call नंतर झाडल्या गोळ्या

एएसआय गोपाल दास हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर 7-8 वर्षांपासून उपचार सुरू आहेत. या आजारासाठी तो गेल्या 7-8 वर्षांपासून औषध घेत आहे. औषधे घेतल्यानंतर तो नेहमी सामान्य वागायचा.

आरोग्यमंत्र्यांवर गोळ्या घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने आधी घरी केला Video Call नंतर झाडल्या गोळ्या
गोपाल दास यांनी शनी शिंगणापूरला परिवारासह पूजा केली होतीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:02 AM

भुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांच्यावर (Odisha Health Minister Naba Das) रविवारी जीवघेणा हल्ला झाला होता. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असताना त्यांच्यांवर हा हल्ला झाला. या हल्ल्यात नाबा दास यांचा मृत्यू झाला. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांच्यावर गोळ्या घातल्या. प्रचंड सुरक्षा बंदोबस्त असतानाही हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास एका कार्यक्रमासाठी झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ आले होते. त्यावेळी त्यांच्यांवर एकापाठोपाठ ५ राऊंड गोळीबार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून पोलीस अधिकारी आहे. ASI गोपाल दास त्याचे नाव आहे. तो झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगर येथील गांधी चौक पोलिस चौकीत तैनात होतो. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला. आता गोपाल दास याच्या पत्नीने धक्कादायक माहिती दिली आहे.

पत्नीकडून  धक्कादायक माहिती

हे सुद्धा वाचा

एएसआय गोपाल दास यांच्या पत्नी जयंती दास यांनी माध्यमांना माहिती दिली.  त्या म्हणाल्या, घटनेच्या आधी गोपालचे मुलीशी व्हिडिओ कॉलवर बोलणे झाले होते. तो  त्यांचा शेवटचा कॉल होता.  काय झाले हे मला माहीत नाही. मला बातमीवरून या घटनेची माहिती मिळाली. माझे त्या दिवशी गोपालशी बोलणे झाले नाही. यापुर्वी पाच महिन्यांपूर्वी तो घरी आला होता.

गोपालदास मनोरुग्ण

एएसआय गोपाल दास हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर 7-8 वर्षांपासून उपचार सुरू आहेत. या आजारासाठी तो गेल्या 7-8 वर्षांपासून औषध घेत आहे. औषधे घेतल्यानंतर तो नेहमी सामान्य वागायचा, असे जयंती दास यांनी सांगितले.

गोळीबार करुन फरार

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एका सार्वजनिक कार्यालयासाठी नबा दास प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यांच्या स्वागतासाठी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यावेळी जवळून गोळीबार करून एक पोलीस पळून जात असल्याचे लोकांनी पाहिले.

शनी शिंगणापूरला १ कोटींची देणगी

बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते नबा दास महाराष्ट्रातही चर्चेत आले होते. त्यांनी शनी शिंगणापूर मंदिराला एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा सोन्याचा कलश दान केला होता. १.७ किलो सोने आणि ५ किलो चांदीचा हा कलश होता.

सर्वात श्रीमंत मंत्री

नबा दास हे ओडिशा सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे संबलपूर, भुवनेश्वर आणि झारसुगुडा येथील विविध बँकांमध्ये 45 लाख रुपयांहून अधिक ठेवी आहेत. त्यांच्यांकडे सुमारे 15 कोटी रुपयांची 70 हून अधिक वाहने आहेत. ज्यामध्ये 1.14 कोटी किमतीची मर्सिडीज बेंझ देखील समाविष्ट आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.