MP Crime : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली; आत्महत्या की हत्या ? गूढ कायम

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता धर्मेंद्र फासावर लटकत असल्याचे दिसले. धर्मेंद्र यांची पत्नी अमरेशही घराच्या आतील खोलीत लटकलेली आढळली. तर 12 वर्षांचा मुलगा प्रशांत आणि 10 वर्षांची मुलगी मीनाक्षी जमिनीवर बेशुद्ध पडले होते.

MP Crime : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली; आत्महत्या की हत्या ? गूढ कायम
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 7:00 PM

मध्य प्रदेश : एकाच कुटुंबातील तिघांचा रहस्यमयरित्या मृत्यू (Death) झाल्याची बाब मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आई, वडील आणि मुलाचा मृत्यू झाला असून मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली. ही आत्महत्या (Suicide) आहे की हत्या (Murder) याबाबत गूढ असून मुलगी शुद्धीवर आल्यावरच या घटनेतील रहस्य उलगडेल, असे पोलिसांनी सांगितले. मुलीला उपचारासाठी गोहाड येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिची चिंताजनक असल्याने तिला ग्वाल्हेररला हलविण्यात आले. पती-पत्नीचे मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत, तर मुलगा आणि मुलगी जमिनीवर पडलेले आढळले. सध्या याप्रकरणी आत्महत्येच्या दृष्टीनेच तपास करण्यात येत आहे.

आई, वडिल आणि मुलाचा मृत्यू तर मुलगी बेशुद्ध

कटवा गुर्जर गावात राहणारे धर्मेंद्र यांचे कुटुंब रोज सकाळी लवकर उठते. मात्र शनिवारी धर्मेंद्र यांच्या कुटुंबातील एकही सदस्य उठला नाही आणि कोणीही घराबाहेर पडले नाही. शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत धर्मेंद्र यांचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता धर्मेंद्र फासावर लटकत असल्याचे दिसले. धर्मेंद्र यांची पत्नी अमरेशही घराच्या आतील खोलीत लटकलेली आढळली. तर 12 वर्षांचा मुलगा प्रशांत आणि 10 वर्षांची मुलगी मीनाक्षी जमिनीवर बेशुद्ध पडले होते. धर्मेंद्र आणि अमरीशसह त्यांचा मुलगा प्रशांत यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी मीनाक्षी श्वास घेत होती. मीनाक्षीला तात्काळ गोहाड रुग्णालयात नेत प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल

घटनेची माहिती मिळताच भिंडचे एसपी शैलेंद्र सिंहही घटनास्थळी पोहोचले. मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र तपास सुरू आहे. या खटल्यात मुलगी एकमेव साक्षीदार असल्याचे दिसते. त्यामुळे तिची साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारणही स्पष्ट होणार आहे, असे शैलेंद्र सिंह यांनी सांगितले. (Mysterious death of three members of the same family in Madhya Pradesh)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.