हत्या की आत्महत्या? बी. टेक.चा विद्यार्थी निशंकच्या मृत्यूनंतर वडिलांना धार्मिक मेसेज, पोलिसांसमोर गूढ

मेसेजमध्ये लिहिले होते की- राठोड साहेब, तुमचा मुलगा मोठा शूर होता. गस्ताख-ए-नबीची एकच शिक्षा आहे ती म्हणजे धडापासून शीर वेगळे. मृत निशंक राठोडच्या मोबाईल फोनरुनच हा मेसेज त्याच्या वडिलांना पाठवण्यात आला आहे. या व्हॉट्सअप मेसेजमुळे आता या घटनेचे गूढ वाढले आहे.

हत्या की आत्महत्या? बी. टेक.चा विद्यार्थी निशंकच्या मृत्यूनंतर वडिलांना धार्मिक मेसेज, पोलिसांसमोर गूढ
हत्या की आत्महत्या?Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 2:50 PM

भोपाळ – द्वेष आणि अपवांचा बाजार जेव्हा तापलेला असतो, तेव्हा एखादी छोटी घटनाही द्वेषाची आग भडकवण्यासाठी पुरेशी असते. असा एक प्रकार मध्यप्रदेशात रायसेन जिल्ह्यात घडला आहे. शहरापासून 40 किमी अंतरावर रेल्वे रुळांवर एका तरुणाचा मृतदेह गेल्या रविवारी सापडला होता. प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे वाटत होते. मात्र या घटनेनंतर 20 मिनिटांनी या तरुणाच्या वडिलांना त्यांच्या मोबाईलवर एक असा व्हॉट्सअप मेसेज आला की, त्यानंतर हे प्रकरण आत्महत्येचं न राहता हत्येच्या गूढ दिशेने सरकू लागलं. निशंक राठोड या तरुणाचा हा मृतदेह होता. निशंक बीटेकचा विद्यार्थी होता.

मोबाईलवर काय आला मेसेज?

या मेसेजमुळे या तरुणाची हत्या झाल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतो आहे. मेसेजमध्ये लिहिले होते की- राठोड साहेब, तुमचा मुलगा मोठा शूर होता. गस्ताख-ए-नबीची एकच शिक्षा आहे ती म्हणजे धडापासून शीर वेगळे. मृत निशंक राठोडच्या मोबाईल फोनरुनच हा मेसेज त्याच्या वडिलांना पाठवण्यात आला आहे. या व्हॉट्सअप मेसेजमुळे आता या घटनेचे गूढ वाढले आहे. निशंक राठोडने जर आत्महत्या केली असेल तर आत्महत्या करण्यापूर्वी तो आपल्या मोबाईलवरुन असा विचित्र मेसेज का पाठवेल. ही घोषणा ज्या काळात द्वेषाचे दुसरे नाव झाली असेल, या घोषणेसह अनेक हत्यांची प्रकरणे समोर आलेली असताना, एका तरुणाने आत्महत्येपूर्वी वडिलांना त्याच्या मोबाईलवरुन पाठवलेल्या या विचित्र मेसेजमुळे या घटनेचे गूढ चांगलेच वाढलेले आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीही महत्त्वाची

खरंच निशंकची हत्या झाली आहे का, हा प्रश्न आहे. की त्याने आत्महत्याच केली. आता भोपाळ पोलिसांपासून ते रायसेन पोलिसांपर्यंत सगळेच जण या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत. याचवेळी जेव्हा निशंकच्या इन्साग्राम आयडीवरुन शेअर करण्यात आलेल्या स्टोरीवर सगळ्यांची नजर पडली, तेव्हा सगळ्यांना पुन्हा धक्का बसलेला आहे. ही स्टोरीही त्या मेसेजप्रमाणेच आहे. या स्टोरीतही गुस्ताख-ए-नबीची एकही सजा, सर तनसे जुदा असेच लिहिलेले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस तपासात आत्तापर्यंत काय?

निशंक रविवारी सकाळी टीटी नगरहून त्याच्या बहिणीच्या घरी साकेत नगरला जाण्यासाठी निघाला होता. त्यानंचर दिवसभर त्याचा मोबाईलवर संपर्क होत नव्हता. त्याला कॉल केल्यावर फक्त बेल वाजत होती. फोन उचलत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार टीटी नगर पोलीस ठाण्यात दाखल केली.

रेल्वे रुळांवर सापडला मृतदेह

तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या तरुणाला शोधण्यास सुरुवात केली. दरम्यान संध्याकाळी रायसेन जिल्ह्याच्या रेल्वे रुळांवर एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मृतदेह मिळण्याच्या वीस मिनिटांपूर्वी निशंकच्या वडिलांच्या व्हॉसअपवर तो रहस्यमयी मेसेज आला होता. सकृतदर्शनी ही आत्महत्या वाटत असली तरी या मेसेजने या मृत्यूचं गूढ वाढवलेलं आहे. हे नक्की

सीसीटीव्ही फूटेजमध्ये एकटाच दिसला निशंक

या सगळ्यात निशंक कसा आणि कुठे गाला याचा शोध सीसीटीव्हीवरही घेण्यात आला. यात तो स्कूटीवर एकटाच असल्याचे अनेक ठिकाणी दिसले. घटनास्थळाच्या 7 किमी अगोदर एका पेट्रोलपंपावरील सीसीटीव्हीतही निशंक एकटाच स्कूटीवर जात असल्याचे दिसते आहे. म्हणजेच मृत्यूपूर्वी त्याच्यावर कुणी जबरदस्ती केल्याचे सीसीटीव्हीत कुठेही दिसत नाही.

स्कूटीत टाकले होते 400 रुपयांचे पेट्रोल

या पेट्रोलपंपावर जिथे निशंक सीसीटीव्हीत दिसला, तिथे त्याने 400 रुपयांचे पेट्रोल भरले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याने हे पेट्रोल भरले. जर त्याला लगेचच आत्महत्याच करायची होती, तर त्याने 400 रुपयांचे पेट्रोल का भरले असाही प्रश्न आता उपस्थित करण्यात येतो आहे. दुसरे जर त्याला आत्महत्याच करायची होती तर त्याने भोपाळमध्ये न करता रायसनीचा पर्याय का स्वीकारला असावा, असे अनेक प्रश्न गुंतागुंत निर्माण करीत आहेत.

स्कूटी, मोबाईल करण्यात आले जप्त

या गूढ प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी निशंकची स्कूटी, मोबाईल आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. ज्या मोबाईलवरुन त्याच्या वडिलांना मेसेज मिळाला होता तो मोबाईलही पोलिसांच्या हाती लागलेला आहे. जर हे प्रकरण आत्महत्येचे असेल तर त्याच्या मोबाईवरुन हा विचित्र मेसेज पाठवला तरी कुणी, असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. आणि जर ही आत्महत्या नसून हत्या असेल तर सीसीटीव्ही फूटेजमध्ये दुसरे कुणीच कसे दिसत नाहीये.

तपास एसआयटीकडे

या प्रकरणाचा तपास मध्य प्रदेश सरकारने एसआयटीकडे सोपवला आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी सांगितले की हे प्रकरण आत्महत्येचेच वाटते आहे, मात्र त्याच्या वडिलांना आलेला मेसेज आणि इन्स्टावरची पोस्ट यामुळे याप्रकरणाचे गूढ वाढलेले आहे. निशांतच्या मृतदेहाच्या पोसल्टमार्टेमनंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला आहे. मात्र त्याचा व्हिसरा सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. निशंकने काही विषारी पदार्थ तर खाल्ले नव्हते ना, याचा तपास करण्यात येतो आहे. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये ट्रेनखाली आल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याच्या शरिरावर रेल्वेने कापल्याच्याव्यतिरिक्त उतर कोणत्याही जखमा नाहीत.

नुपुर किंवा कन्हैय्याच्या पाठिंब्याची एकही पोस्ट केली नव्हती

मूळचा नर्मदापूरम जिल्ह्यातील सिवनी मालवाचा रहिवासी असलेला निशंक राठोड भोपाळमध्ये शिक्षण घेत होता. गेल्या महिनाभरात त्याने नुपुर शर्मा किंवना कन्हैय्याच्या समर्थनार्थ एकही पोस्ट केलेली नव्हती. सोशल मीडियावर कोणतीही वादग्रस्त पो्ट त्याने केलेली नव्हती. अशा स्थितीत द्वेषाच्या राजकारणातून त्याची हत्या करण्यात आली आहे का, याचे उत्तर अद्याप तरी मिळालेले नाही. ती शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.