Chandrashekhar guruji Murder : कर्नाटक चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरण, दोन आरोपींना बेळगावमधून अटक

दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून अटक करण्यात आली आहे. मल्तेश आणि मंजुनाथ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Chandrashekhar guruji Murder : कर्नाटक चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरण, दोन आरोपींना बेळगावमधून अटक
आरोपी मल्तेश आणि मंजुनाथ Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 6:48 PM

कर्नाटक : सरल वास्तु फेम चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांच्या हत्या (Murder) प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक (Arrest) करण्यास पोलिसांना यश आले आहे. दोन्ही आरोपींना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून अटक करण्यात आली आहे. मल्तेश आणि मंजुनाथ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशी केल्यानंतरच त्यांनी हत्या का केले हे उघड होईल. पोलिसांनी सांगितले की, चंद्रशेखर गुरुजींना कोणीतरी फोन करुन हॉटेलच्या लॉबीमध्ये येण्यास सांगितले होते. ते लॉबीत येताच दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी विजय नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुरुजींच्या कुटुंबीयांचेही जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हत्या केल्यानंतर आरोपींचे पलायन

गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा 3 दिवसांपूर्वी हुबळी येथे मृत्यू झाला होता, त्यामुळे ते हुबळीला आले होते. याचदरम्यान, चंद्रशेखर गुरुजी हे शहरातील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये व्यवसायानिमित्त कोणाला तरी भेटण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी चाकू भोसकून त्यांना ठार केल्याचे पोलिसांनी सांगितले. चाकू भोसकल्यानंतर गुरुजी मेल्याची खात्री होताच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हुबळीचे पोलीस आयुक्त लाभू राम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देत प्रकरणाचा तपास सुरु केला.

सीसीटीव्हीत काय आहे?

दोन्ही आरोपी हॉटेलच्या वेटिंग एरियात चंद्रशेखर गुरुजींची वाट पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर चंद्रशेखर गुरुजी तेथे आले आणि सोफ्यावर बसले. यानंतर एक आरोपी जवळ आला आणि त्याच्या पाया पडला. त्याचवेळी दुसऱ्या आरोपीने चाकू काढून त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, दुसरा आरोपीनेही त्याच्या खिशातून चाकू काढला आणि दोघे मिळून त्याच्यावर चाकूने वार केले. हॉटेलमध्ये उपस्थित काही लोक गुरुजींना वाचवण्यासाठी पुढे आले. मात्र आरोपींनी त्यांनाही मारण्याची धमकी दिली. त्यामुळे लोक घाबरुन मागे हटले. त्यानंतर आरोपींनी पुन्हा चंद्रशेखर गुरुजींवर चाकूने हल्ला केला. गुरुजी मेल्याची खात्री होताच आरोपींनी तेथून पळ काढला. (Karnataka Two accused in Chandrasekhar Guruji murder case arrested from Belgaum)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.