International Youth Day : केव्हा आणि कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय युवक दिन, जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय युवक दिन पहिल्यांदा 12 ऑगस्ट 2000 मध्ये साजरा केला गेला. हा निर्णय संयुक्त राष्ट्र सभेने 17 डिसेंबर 1999 मध्ये घेतला. त्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले.

International Youth Day : केव्हा आणि कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय युवक दिन, जाणून घ्या
केव्हा आणि कसा सुरू झाला आंतरराष्ट्रीय युवक दिनImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 12:30 AM

देशाच्या विकासात युवकांची भूमिका महत्त्वाची असते. युवकांना देश, जगाची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीची माहिती असावी. देशाच्या विकासाची आवड असली पाहिजे. याच उद्देशाने 12 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो. युवक दिनी युवकांचा आवाज आणि कार्य याची ओळख जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. तुम्हाला माहिती आहे का की, आंतरराष्ट्रीय युवक दिन केव्हा साजरा केला गेला? चला तर मग जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय युवक दिवसाचा इतिहास (History), उद्देश (Purpose) आणि महत्त्व (Significance)…

सुरुवात कशी झाली?

आंतरराष्ट्रीय युवक दिन पहिल्यांदा 12 ऑगस्ट 2000 मध्ये साजरा केला गेला. हा निर्णय संयुक्त राष्ट्र सभेने 17 डिसेंबर 1999 मध्ये घेतला. त्या दिवशी आंतरराष्ट्रीय युवक दिन साजरा करण्याचे ठरविण्यात आले. परंतु, याची सूचना 1998 मध्ये विश्व संमेलनात देण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने 1985 मध्ये आंतरराष्ट्रीय युवक वर्ष घोषित केले.

का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवक दिवस?

आंतरराष्ट्रीय युवक दिवस साजरा करण्याचा उद्देश सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयांवर युवकांची हिस्सेदारी आणि त्यांची भूमिकेवर चर्चा करणे आहे. युवकांना समाजातील काही मुद्द्यांना समोर आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो.

हे सुद्धा वाचा

कसा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय युवक दिवस?

आंतरराष्ट्रीय महिला दिवस, कामगार दिन, योग दिनसारखाच आंतरराष्ट्रीय युवक दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र दरवर्षी युवक दिनाची एक थीम निश्चित करते. थीमनुसार देश-विदेशात कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते. जगातील युवकांना आपले विचार प्रकट करण्याची संधी मिळते. युवकांच्या समस्या माहिती करून घेत त्यात काय सुधारणा करता येतील, याचा प्रयत्न केला जातो.

आंतरराष्ट्रीय युवक दिवसाची थीम

2022 ला आंतरराष्ट्रीय युवक दिवसाची थीम अंतर्गत एकता – सर्व वयोगटातील लोकांसाठी जग अशी आहे. 6 ते 13 वयोगटातील काही मुलं शिक्षण घेऊ शकत नाही. त्यांच्यात गणितीय कौशल्य कमी आहेत. हे सर्व गरिबीमुळं होत आहे. यावर लक्ष केंद्रीत करणे हे यंदाच्या आंतरराष्ट्रीय युवक दिवसाची थीम आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.