भारतीय सैन्यदलाने अखेर घेतला बदला, काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांचा मारेकरी यमसदनी, एन्काऊंटरमध्ये लष्करच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

राहुल भट्ट यांच्या मारेकऱ्यांना ठार मारण्यात अखेरीस सैन्यदलाला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरात जाणीवपूर्वक टार्गेट किलिंगचा प्रकार दहशतवाद्यांकडून सुरु करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलाकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येते आहे.

भारतीय सैन्यदलाने अखेर घेतला बदला, काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांचा मारेकरी यमसदनी, एन्काऊंटरमध्ये लष्करच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान
राहुल भट्ट यांचा मारेकरी यमसदनीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 7:09 PM

श्रीनगर- काश्मिरी पंडित राहुल भट्ट (Rahul Bhatt)यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अखेर भारतीय सैन्यदलाने यमसदनी (murderer killed)पाठवले आहे. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सैन्यदल (Indian Army)आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. वाटरहेल परिसरात ही चकमक झाली. या तीन दहशतवाद्यांतील एक दहशतवादी हा राहुल भट्ट यांचा मारेकरी होता. हे तिघेही दहशतवादी हे लष्टकर-ए-तोयबाशी संबंधित होते. या तिघांनाही परिसरात सैन्यदलाने घेरले होते. यातील एक दहशतवादी लतीफ राथर याने राहुल भट्ट, अमरीन भट्ट यांच्यासह अनेकांच्या हत्येतील आरोपी होता. राहुल भट्ट यांच्या मारेकऱ्यांना ठार मारण्यात अखेरीस सैन्यदलाला यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मिरात जाणीवपूर्वक टार्गेट किलिंगचा प्रकार दहशतवाद्यांकडून सुरु करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलाकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येते आहे.

मोठ्या प्रमाणात आयईडीही केले जप्त

दुसरीकडे पुलवामा परिसरात सैन्यदलाने मोठा कट उद्ध्वस्त केला आहे. यात मोठ्या प्रमाणात आयईडी ( इम्प्रोव्हाईड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) जप्त करण्यात आले आहेत. या दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित असल्याचा पोलिसांना आणि सैन्य दलाला संशय आहे. पोलीस आणि सैन्यदलाने केलेल्या एकत्रित कारवाीत पुलवामच्या सर्क्युलर रोडवर काँग्रेसजवळ 25 ते 30 किलो आयईडी जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर ही स्फोटके निकामी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या परिसरात मोठी कारवाई करण्याच्या प्रयत्नात दहशतवादी असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

या वर्षभरात 139 दहशतवाद्यांना कंठस्नान

सैन्यदलाक़डून काश्मीर खोऱ्यात सध्या ऑपरेशन ऑलआऊट सुरु आहे. सरकारी आकडेवारीनुसार आत्तापर्यंत काश्मीरमध्ये 139 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले आहे. यातील 32 जण हे परदेशातील असल्याची माहितीही समोर आली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सहा जणांना ठार मारण्यात आले. त्यात 4 लष्कर ए तोयबाचे तर दोन जण जैश ए मोहम्मदशी संबंधित होते.

हे सुद्धा वाचा

उ. प्रदेशात इसिसच्या दहशतवाद्याला अटक

दरम्यान मंगळवारी एटीएसने उ. प्रदेशात आझमगडमध्ये एका इसिसच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी स्वातंत्र्यदिनी स्फोट घडवण्याच्या तयारीत होता, अशी माहिती आहे. सबाउद्दीन आजमी असे या दहशतवाद्याचे नाव असून, इसिसमध्ये भरती करणाऱ्यांच्या तो थेट संपर्कात होता. त्याच्याकडून आयईडी तयार करण्याचे सामानही जप्त करण्यात आले आहे. सबाउद्दीन आजमी हा असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमच्या पार्टीचा सदस्य असल्याचेही समोर आले आहे. त्याच्या मोबाईल डेटाच्या तपासणीत मुस्लीम तरुणांची दिशाभूल करणाऱ्या एका टेलिग्राम चॅनेलशीही तो संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.