शिवसेनेच्या दौऱ्याला वैचारिक विरोध, अयोध्येच्या हनुमानगढीचे मुख्य महंत राजूदास महाराजांची भूमिका, शिवसेनेच्या हिंदुत्वावर उपस्थित केले प्रश्न
शिवसेनेची राज्यात एक आणि अयोध्येत दुसरी भूमिका असल्याची टीका महंत राजूदास यांनी केली आहे. महाराष्ट्रात पालघरमध्ये संताची हत्या होते, मात्र सरकारकडून त्या प्रकरणात न्याय मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
अयोध्या – शिवसेनेची (Shivsena tour)भूमिका महाराष्ट्रात एक आणि अयोध्येत दुसरी आहे, अशी सरड्यासारखी भूमिका बदलणाऱ्या, पक्षाच्या अयोध्या दौऱ्याला आपला वैचारिक विरोध असल्याचे अयोध्येतील हनुमान गढीचे (Hanuman gadhi, Ayodhya)मुख्य महंत राजू दास महाराज यांनी स्पष्ट केले आहे. जो शिवसेना पक्ष आत्ता-आत्तापर्यंत सनातन धर्म संस्कृती आणि हिंदुत्वाची भूमिका मांडत होता, त्या पक्षाला आता कोणत्या असहाय्यतेमुळे भूमिक बदलावी लागत आहे, असा प्रश्नही महंतांनी उपस्थित केला आहे. यानिमित्ताने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray)दौऱ्याला अयोध्येतील प्रमुख हनुमानगढीच्या महतांचा वैचारिक विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्न
शिवसेनेची राज्यात एक आणि अयोध्येत दुसरी भूमिका असल्याची टीका महंत राजूदास यांनी केली आहे. महाराष्ट्रात पालघरमध्ये संताची हत्या होते, मात्र सरकारकडून त्या प्रकरणात न्याय मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. दुसरे राणा दाम्पत्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुनही महतांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याला विरोध केल्याची भूमिका शिवसेनेने घेतली, त्यांना तुम्ही तुरुंगात डांबले, हे योग्य नसल्याचे महंतांचे म्हणणे आहे.
दौरा धार्मिक की राजकीय?
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, अयोध्याचा दौरा हा धार्मिक आहे, राजकीय नाही. पण संपूर्ण अयोध्या शहर हे शिवसेनेच्या होर्डिंग्स आणि बॅनर्सने व्यापून गेलेला आहे. मग हा राजकीय दौरा नाहीतर काय आहे?, असा प्रश्नही महंतांनी उपस्थित केला आहे.
अशी काय असहाय परिस्थिती आलीय की शिवसेनेला रंग बदलावा लागतोय?
बाळासाहेब ठाकरेंचे रौद्र रूप होते. जे सनातन संस्कृती धर्म रक्षणाची भाषा बोलायचे, त्यांनी जाहीरपणे सांगितले की होय आम्ही बाबरी मशीद पडली होती. मग आज अशी काय परिस्थिती आली की तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्यांसोबत गेला आहात, असा सवाल महतांनी केला आहे. ज्यांनी रामाचा विरोध, राम जन्मभूमीचा विरोध आणि साधू संतांना आयएसआय संघटनेशी जोडले, त्यांच्यासोबत तुम्ही आघाडी कशी केली, असा सवाल महतांनी शिवसेनेला केलेला आहे.