Gyanvapi Survey Court Verdict: शिवलिंगाच्या चारही बाजूचे ढिगारे हटवा; मशिदीचा बंद दरवाजा उघडा; हिंदू पक्षाची मागणी
ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीत बंद असलेला दरवाजा जो माँ शृंगार गौरीकडे जाणारा आहे तो उघडण्याची मागणी या महिलांकडून केली गेली आहे.
मुंबई: वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचे (Gyanvapi Mosque) सर्वेक्षण पूर्ण झाले असले तरी अहवालाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. अहवाल येण्यापूर्वीच हिंदू (Hindu) पक्षाकडून मात्र उर्वरित मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मशिदीमधील शिवलिंगाभोवतीची भिंत (Shivling Wall) हटवून पूर्वेकडील भिंत उघडण्याची मागणी करणारी याचिकाही मंगळवारी दाखल करण्यात आली होती. मात्र त्यावर अजून न्यायालयाचा निर्णय आला नाही.
सर्वेक्षण अहवाल सादर करण्याच्या मुद्याबाबत वाराणसी न्यायालयात अजूनही सुनावणी सुरू आहे. याचिकाकर्त्या सीता साहू, मीनू व्यास आणि रेखा पाठक यांनी त्या शिवलिंगाभोवती बांधण्याता आलेली भिंत हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवलिंगाच्या भोवता असणारी भिंत काढून टाकावी, असे त्यांचे म्हणणे आहे, कारण शिवलिंगाला सिमेंट आणि दगडांनी जोडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.
बंद दरवाजा उघडण्याची मागणी
ज्ञानवापीच्या पश्चिमेकडील भिंतीत बंद असलेला दरवाजा जो माँ शृंगार गौरीकडे जाणारा आहे तो उघडण्याची मागणी या महिलांकडून केली गेली आहे. यावेळी अशीही मागणीही केली गेली आहे की, पूर्वेकडील भिंतीचा दरवाजा उघडून आत जावे, त्यामुळे शिवलिंगापर्यंत पोहोचता येईल, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सरकारी वकिलांच्या मागणीला विरोध
हिंदू पक्षाच्या बाजूच्या वकिलांचा असा दावा आहे की, वाळूखानाच्या खाली शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी पूर्वेकडून एक दरवाजा आहे, मात्र त्याकडे जाण्याच्या मार्गावर खूप कचरा आहे. आणि तो काढला पाहिजे. यासोबतच वादी हिंदू पक्षाच्या वकिलांनी शौचालय व शौचालय स्थलांतरित करण्याची सरकारी वकिलांची ही मागणी मात्र फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे.
दोन्ही पक्षांचे आक्षेप नोंदविले
वकिल आयुक्त अजय कुमार मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की मला भिंतीबाबत काही ही करण्याचा अधिकार नाही. तसेच या भिंतीबाबत एका व्हिडिओग्राफरने माध्यमांशी संवाद साधला आहे की, त्यामुळे अहवालाच्या गोपनीयतेचे उल्लंघन होणार आहे. माध्यमांसमोर दिलेले वक्तव्य व मुलाखतीबाबत वादी-प्रतिवादींच्यावतीने न्यायालयात आक्षेप नोंदविण्यात आला होता.
दोन दिवसांचा अवधी
तसेच या शिवलिंगाबाबत पाहणी अहवाल सादर करण्यासाठी आणखी दोन दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. याबाबत न्यायालय आयु्क्तांकडून सांगण्यात आले आहे की, सर्व्हेचा अहवाल तयार आहे, पण त्यात काही सुधारणा आणि पद्धतशीरपणा हवा आहे. त्यासाठी दोन दिवस लागतील. आता हिंदू बाजूच्या वकिलांची मागणी आणि न्यायालय आयुक्तांनी मुदत वाढविण्याच्या मागणीवर न्यायालय चार वाजता निकाल सुनावणार आहे.
काही वेळातच निकाल
हिंदू बाजूच्या वकिलांचे म्हणणे आहे की, पूर्वेकडील भिंत पाडून शिवलिंगाभोवतीचा ढिगारा हटवण्याच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली आहे, तसेच याबाबत न्यायालयाकडूनही काही वेळात निर्णय देण्यात येईल. याबरोबरच कोर्ट कमिशनरकडूनही दोन दिवसांची यासाठी मुदत मागण्यात आली आहे. नी 2 दिवसांची मुदत मागितली आहे, त्यावर कोर्टही निर्णय देणार आहे. यावेळी न्यायालयाकडून वादी व प्रतिवादी यांचा युक्तिवादही ऐकून घेतला आहे.