ब्रेकिंग! राजधानीत दिल्लीमध्ये पुन्हा मास्कसक्ती, मास्क नसल्यास 500 रुपये दंड, राज्यात काय स्थिती?
Delhi Corona Mask Compulsory ;मास्क घातला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. दिल्लीमध्ये ओमयक्रॉनचे बीए फोर आणि बीए फायईव्ह सब वेरीएंटचे अनेक केस आढळून आले आहेत.
दिल्लीत (Delhi News) वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या (India Corona News) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क घातला नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. ल्लीत वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात आली आहे. मास्क घातला (Mask Compulsory) नसेल तर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. एएनआयनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. दिल्लीमधील अरविंद केजरीवाल सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कारमधून प्रवास कऱणाऱ्या लोकांना मास्क बंधनकारक नसेल. कारमधून विना मास्क लोक प्रवास करु शकतात. पण सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे.
#COVID19 | GoVt of Delhi makes wearing of face mask/cover in all public places mandatory; a fine of Rs 500 will be imposed on violators.
हे सुद्धा वाचाThe fine under this provision of the notification will not be applicable to persons travelling together in private four-wheeler vehicles. pic.twitter.com/sCUHspkQ1e
— ANI (@ANI) August 11, 2022
दिल्लीत गेल्या 24 तासात 2146 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 180 दिवसातली ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. दरम्यान, याआधी 13 जानेवारीला दिल्लीत 12 रुग्णांचा बळी गेला होता. मंगळवारी दिल्लीत 2495 कोरोना रुग्ण आढळून आले. तर पॉझिटिव्हिटी रेट हा 15.41 इतका असल्याचं समोर आलंय. तर सहा जणांचा मृत्यू झालाय.य याआधी 21 जानेवारीला दिल्लीचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 18.04 टक्के इतका होता.
दिल्लीत गेल्या दहा दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तर 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान 14 रुग्ण दगावले होते. दिल्लीतील 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टमधील मृतांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
- 1 ऑगस्ट – 2 मृत्यू
- 2 ऑगस्ट – 3 मृत्यू
- 3 ऑगस्ट – 5 मृत्यू
- 4 ऑगस्ट – 4 मृत्यू
- 5 ऑगस्ट – 2 मृत्यू
- 6 ऑगस्ट – 1 मृत्यू
- 7 ऑगस्ट – 2 मृत्यू
- 8 ऑगस्ट – 6 मृत्यू
- 9 ऑगस्ट – 7 मृत्यू
- 10 ऑगस्ट – 8 मृत्यू
दिल्लीमध्ये ओमयक्रॉनचे बीए फोर आणि बीए फायईव्ह सब वेरीएंटचे अनेक केस आढळून आले आहेत. त्यामुळे संक्रमणाचं प्रमाण दिल्लीत वाढलंय. गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्यमंत्रालयानं राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 16 हजार 299 कोरोना रुग्णांची भर पडल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशाचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.58 इतका आहे. दिल्लीतल वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जातेय.