महाराष्ट्रातील ‘या’ 6 जिल्ह्यात कोरोनाचा कहर; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर…
दिल्लीत 521 आणि उत्तर प्रदेशमध्ये 91 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 521 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : कोरोनाची परिस्थिती देशातील अनेक राज्यात वाढत असल्याचे सांगून काही जिल्ह्यांमधून मास्क सक्ती करण्याची तयारी केली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह महाराष्ट्रातही कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाकडूनही आता कोरोना बाबतीत काळजी घेतली जात आहे. इन्फ्लूएंझाच्या H3N2 याचे ही रुग्णसंख्या वाढत असून कोरोनाचे रुग्णसंख्या प्रचंड वाढत असल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आले आहे. कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कोरोना नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे.
गेल्या 24 तासामध्ये महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये 1 हजार 323 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या आकडेवारीतही झपाट्याने झालेली वाढ पाहून डब्लूएचओनेदेखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सर्व देश आणि राज्यांनी कोरोना विषाणूपासून सतर्क राहण्याची गरज असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
देशाच्या राजधानीसह राज्याच्या राजधानीतही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. तर महाराष्ट्रात 711 नवीन कोरोनाचे रुग्ण मिळाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात महाराष्ट्रात कोरोनाने तब्बल 186 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात आता भीतीचे वातावरण पसरले आहे. त्याबरोबरच मृत्यूदर 1.82 टक्क्यांनी नोंदवला गेला आहे.
दिल्लीत 521 आणि उत्तर प्रदेशमध्ये 91 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 521 नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
सध्या दिल्लीत कोरोनाचे 1710 रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये 24 तासांमध्ये 91 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रचंड फैलाव होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. राज्यातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ही 3 हजार 792 रुग्ण आढळले आहेत.