Coromandel Express accident : बालासोरमध्ये एकापाठोपाठ एक अपघाताला बळी पडल्या तीन रेल्वे, टळू शकत होता अपघात?

Odisha train accident updates : बालासोर रेल्वे अपघाताला २० तास झालेत. पण, तीन रेल्वे एकमेकांना कशा आदळल्या हे अद्याप बहुतेकांना माहीत नाही. रेल्वे अपघातानंतर वेगवेगळ्या बाजू मांडण्यात येत आहेत.

Coromandel Express accident : बालासोरमध्ये एकापाठोपाठ एक अपघाताला बळी पडल्या तीन रेल्वे, टळू शकत होता अपघात?
BALASOR 1 NImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 5:08 PM

बालासोर : ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन रेल्वेंचा अपघात झाला. यामुळे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, २३३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. सुमारे ९०० लोकं जखमी असल्याची माहिती आहे. या अपघातानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफपासून सुरक्षा दलाचे जवान बचावकार्यात लागले आहेत. शनिवारी सकाळी मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. अपघातानंतर ओडिशा सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपले दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शनिवारी घटनास्थळाचा दौरा करू शकतात.

बालासोर रेल्वे अपघाताला २० तास झालेत. पण, तीन रेल्वे एकमेकांना कशा आदळल्या हे अद्याप बहुतेकांना माहीत नाही. रेल्वे अपघातानंतर वेगवेगळ्या बाजू मांडण्यात येत आहेत. अशावेळी रेल्वे अपघाताचा घटनाक्रम सांगणे गरजेचे आहे.

कशा झाला रेल्वेचा अपघात ?

शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडळ एक्सप्रेस चेन्नईकडे जात होती. ही रेल्वे ट्रॅकवरून उतरून मालगाडीवर धडकली. प्रवासी रेल्वेचे इंजीन मालगाडीवर चढले. कोरोमंडळच्या काही बोगीज ट्रॅकवर पलटल्या.

हे सुद्धा वाचा

बेंगळुरू हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस बाजूच्या ट्रॅकने हावडाकडे जात होती. दरम्यान, हावडा एक्सप्रेसची टक्कर कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगींशी झाली. या धडकेत कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगी ट्रॅकवरून उतरल्या.

हा अपघात बालासोर जिल्ह्यातील बहंगा बाजार स्टेशनवर झाला. हे ठिकाण कोलकात्यावरून दक्षिणेला २५० किलोमीटर आणि भूवनेश्वरवरून उत्तरेला १७० किलोमीटर अंतरावर आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कोरोमंडलच्या बोगी संध्याकाळी ६.५५ वाजता ट्रॅकवरून उतरल्या. दुसरीकडे, बेंगळुरू-हावडा एक्सप्रेसच्या बोगी ७ वाजता ट्रॅकवरून उतरल्या. हा अपघात पाच मिनिटानंतर झाला.

बालासोर रेल्वे अपघाताचा घटनाक्रम

काल संध्याकाळी साडेसहा वाजता हावडावरून चेन्नईला जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस ओडिशातील बालासोर रेल्वे स्थानकावर पोहचली.

संध्याकाळी ६.५५ मिनिटांनी कोरोमंडल एक्सप्रेस मालगाडीला धडकली. रेल्वेचे इंडीन मालगाडीच्या बोगींवर चढले.

संध्याकाळी ६.५५ ला रेल्वेचे १५ बोगी ट्रॅकवरून उतरून खाली पडले.

संध्यकाळी सात वाजता बेंगळुरू ते हावडा जाणारी बेंगळुरू-हावडा सुफरफास्ट एक्सप्रेस पटरीवरून उतरून बोगीला धडकली.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.