‘पोलीस गोळी नाही मारणार, तर काय #@!$*% मारणार?’ निवृत्त आयपीएस अधिकारी बरळले!
अनेक जणांनी या ट्वीटवरुन सवाल उपस्थित केलेत.
मुंबई : निवृत्त आयपीएस (Retired IPS Officer) अधिकाऱ्यानं केलेलं एक ट्वीट चर्चेत आलंय. हे ट्वीट करताना पातळी सोडून भाषा वापरण्यात आल्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहे. निवृत्त आयपीएसनं केलेल्या ट्वीटमध्ये (Controversial Tweet) रांचीतील एका गोळीबाराचा संदर्भ देण्यात आला आहे. रांचीतील पोलीस एन्काऊंटरच्या एका घटनेवर भाष्य करताना निवृत्त आयपीए अधिकाऱ्यानं आक्षेपार्ह मत नोंदवल्यानं, अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, सोशल मीडियात (Social Media) हे ट्वीट ट्रोल होऊ लागल्यानंतर निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनं आपलं ट्वीट डिलीट केलंय. पण त्याआधीचे या ट्वीटचे फोटो व्हायरल झाले होते. 11 जून ला हे ट्वीट करण्यात आलं होतं. 6 वाजून 10 मिनिटांनी करण्याथ आलेल्या ट्वीटवर 218 जणांनी कमेंट केलं होतं. तर जवळपास दोन हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट करत त्यावर आपली मतं मांडली होती.
निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. एन सी अस्थाना यांनी हे ट्वीट केलं होतं. आपल्या वेरीफाईड ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी हे ट्वीट केलेलं. हिंदू भाषेतून करण्यात आलेल्या या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की,…
कुछ लिब्बू विलाप कर रहै है कि रांची में पुलिस ने दो प्राणियों को गोली मर दी. अरे, भैया, पुलिल गोली नहीं तो क्या **** मारेगी? अब वैसा कर दे तो वेबजह पुलिस के चरित्र पर आक्षेप होगा इसलिये गोली से संतुष्ट रहें
असं ट्वीट डॉ. एन सी अस्थाना यांनी केलं होतं. पोलीस गोळी नाही मारणार तर काय ******* मारणार? तसं केलं तर उगाचच पोलिसांच्या चारीत्र्यावर आक्षेप घ्याल, असा त्यांच्या ट्वीटचा अर्थ होता.
So very proud of @IPS_Association and the kind of officers they train. An ex-IPS says: “So if the Police will not shoot them, what else will they do? F*ck them? And if they r@pe them you will raise questions on the Police’s character.” pic.twitter.com/qpmauldHA8
— Zoya Rasul (@zoyarasul) June 11, 2022
अनेक जणांनी या ट्वीटवरुन सवाल उपस्थित केलेत. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. एन.सी अस्थाना यांच्यावर टीकाही केली जातेय. वाढत्या टीकेला पाहून त्यांनी नंतर आपलं हे ट्वीट डिलीट केलं होतं. पण झोया रासूल नावाच्या एका ट्वीटर युजरने या ट्विटचा स्क्रीनशॉट काढला होता. तो त्यांनी पुन्हा रिपोर्ट करत या ट्वीटवर सगळ्यांचं लक्ष वेघलंय. शिवाय त्यांनी आयपीएस असोसिएशनलाही टॅग टोला लगावलाय.
कोण आहेत डॉ. एन सी अस्थाना?
डॉ. एन.सी अस्थाना हे निवृत्त आयपीएस अधिकारी होतो. केरळचे डिजीपी म्हणूनही त्यांनी काम केलेंय. बीएसएफ आणि सीआरपीएफचे डीजीपी म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली होती. वेगवेगळ्या ज्वलंत विषयांवर ते सातत्यानं आपलं परखड मत मांडत असतात.
रांची गोळीबाराचा विषय नेमका काय?
झारखंड जिल्ह्यातील रांचीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. खंडणी वसुलीसाठी आलेल्या नक्षलवाद्यांवर पोलिसांनी गोळीबार गेला होता. या गोळीबारात एक जखमी झाला होता. तर तिघांना अटक करण्यात आली होती. तर इतर नक्षलवाद्यांची घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर ही घटना चर्चेत आले होती. या घटनेवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.