Talha Saeed : दहशतवाद्यांची भरती ते भारताविरोधात कारवाया, हाफिज सईदचा मुलगा तलहा भारताकडून दहशतवादी घोषित

मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा मुलगा हाफिज तलहा सईद याच्या विरोधात भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने हाफिज तलहाला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे.

Talha Saeed : दहशतवाद्यांची भरती ते भारताविरोधात कारवाया, हाफिज सईदचा मुलगा तलहा भारताकडून दहशतवादी घोषित
हाफिज सईदचा मुलगा तलहा भारताकडून दहशतवादी घोषित Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 2:10 PM

नवी दिल्ली: मुंबईवरील (mumbai) हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा (Hafeez Saeed) मुलगा हाफिज तलहा सईद (talha Saeed) याच्या विरोधात भारताने मोठी कारवाई केली आहे. भारत सरकारने हाफिज तलहाला दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) अधिनियम 1967च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दहशतवादी कारवायांसाठी दहशतवाद्यांची भरती करणे, टेरर फंडिग जमा करणे आणि आफगाणिस्तानातील भारताच्या मालमत्तांना नुकसान पोहोचवण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. त्यामुळे आज केंद्रीय गृहमंत्रालयाने ही मोठी कारवाई केली आहे. हाफिज सईद सध्या तुरुंगात आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांची सर्व सूत्रे तलहा सईद करत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी भारत सरकारने ही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे दहशतवादी कारवायांना वेसन बसेल असं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने हाफिज सईदला 31 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हाफिज सईद तुरुंगात असल्याने तलहाकडून सर्व कारवाया केल्या जात आहेत. दहशतवाद्यांची भरती, टेरर फंडिंग जमा करणे, लश्कर ए तोयबाच्या माध्यमातून भारतात हल्ले करण्यात तलहा सक्रिय होता. आफगाणिस्तानातील भारतीयांच्या संपत्तीला नुकसान पोहोचवण्याचं प्लानिंग करण्याचं काम तलहाने केल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

भारताविरोधात चिथावणीखोर विधाने

तलहा सतत भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असतो. जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून सातत्याने त्याने लोकांची माथी भडकवण्याचं काम केलं आहे. जिहाद करण्याची त्याची भाषा असते. 2007मध्ये त्याचा व्हिडीओ आला होता. काश्मीरचा बदला घेतला जाईल, असं तो या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

166 लोकांनी प्राण गमावले

काही वर्षापूर्वी भारताने हाफिज सईदलाही दहशतवादी घोषित केलं होतं. गेल्या वर्षापासून भारत हाफिज सईदला भारतात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला कोठडी मिळावी यासाठी भारताचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही. हाफिज सईद हा 2008च्या मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात 166 लोकांना प्राण गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या:

26/11 Attack : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला 31 वर्षांचा तुरुंगवास; पाकिस्तान कोर्टाचा निकाल

Political Crisis in Pakistan : स्टिल कंपनीचा व्यापारी ते इम्रान खान यांची झोप उडवणारा नेता; पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील शाहबाज शरीफ कोण?

Maharashtra News Live Update : पोलिस गुणरत्न सदावर्तेंना घेऊन कोर्टात दाखल

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.