Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?

हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

Yavatmal : यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणी, जलशुद्धीकरण यंत्रणा दीड वर्षांपासून बंद, कधी जाग येणार?
यवतमाळमधील किडनीग्रस्त गावाची धक्कादायक कहाणीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 11:41 PM

यवतमाळ : फ्लोराईड क्षारयुक्त अशुद्ध पेयजलामुळे (Water Issue) संपूर्ण महाराष्ट्रात किडनीग्रस्त (Kidney) गाव म्हणून महागाव तालुक्यातील वडदला ओळखलं जात आहे. माजीमंत्री मनोहर नाईक यांच्या निधीतून उभारण्यात आलेली वडद (ब्रह्मी) व सेवादासनगर येथील दोन जलशुद्धीकरण (Water Purification) यंत्रणा दीड वर्षांपासून बंद आहे. गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने त्यांना किडनी आजाराच्या मरण यातना सहन करत जीवन जगावे लावत आहे. पुसद विधानसभासभा मतदारसंघातील वडद हे घनदाट जंगलाला लागून असलेले आदिवासीबहुल गाव आहे. हा गट ग्रामपंचायतीत सेवानगर बंजारा तांडा समाविष्ट आहे. गावची लोकसंख्या जवळपास सात हजार एवढी आहे. मात्र, हे गाव पाण्याची विपुलता असूनही फ्लोराईड क्षारयुक्त पाण्यामुळे शापित ठरले. सरकारी नोंदीनुसार या गावातील जवळपास40 किडनीग्रस्त रुग्ण दगावले.

पैसे मोजून पाणी आणायची वेळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव यांनी हा लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न तत्कालीन मंत्री मनोहर नाईक यांच्यासमोर मांडला होता. त्यांनी तत्परतेने लक्षावधी रुपयांचा निधी आरओ यंत्रणा उभारण्यासाठी उपलब्ध करून दिला. यातून आरओ यंत्रणेतील सुविधा असलेले पहिले गाव वडद ठरले. ही आरओ यंत्रणा दुरुस्तीअभावी ठप्प झाली आहे. त्यामुळे पुन्हा फ्लोराईडयुक्त दूषित पाणी पिण्याची पाळी नागरिकांवर आली आहे. सद्य:स्थितीत नागरिक दहा लिटरच्या कॅनला 20 रुपये मोजून ब्रह्मी गावातून पिण्याचे पाणी आणत आहेत.

प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच

सरपंच स्वाती भारत पडघने यांनी सरपंच पदाचा प्रभार नव्याने हाती घेतल्यानंतर बंद पडलेली आरओ यंत्रणा सुरू करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी ग्रामसेवकांनी परस्पर एजन्सीला काम दिलेले होते. प्रत्येकी तीन लाखांचे दोन धनादेश या एजन्सीला देण्यात आले. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम अर्धवटच आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना सरपंच स्वाती पडघने यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक नागरिकांना किडनीचे आजार

गावात शुद्ध पाणी नसल्याने अनेकांना किडनी आजार जडला आहे. पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात नाही. आता पर्यंत40लोकांचा किडनी आजाराने मृत्यू झाला आहे. आरओ प्लांट बंद आहे. गावातील लोकांना किडनीचा आजार आहे. मलाही हाच त्रास आहे. पाण्यात क्षार आहे. भावाचा किडनी आजाराने मृत्यू झाला. जलशुद्धीकरण यंत्र बंद आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. गावात 70 टक्के रुग्ण गंभीर आहेत.

आरोग्य अधिकारी काय म्हणतात?

दोन पद्धतीने सहा महिन्याला पाण्याची तपासणी केली जाते. फ्लोराईडयुक्त पाण्याचे स्रोत आढळून आल्यास पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाते. गावात किडनीचे रुग्ण आढळून येते असल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांची टीम पाठवण्यात येईल. किडनीच्या आजाराचा नेमका शोध घेण्यात येईल. मेडिकलमध्ये अथवा बोगस डॉक्टरकडे जाऊन कुणीही औषधी घेऊ नये. असे आवाहन जिल्हा आरोग अधिकारी यांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.