Video : ‘काहीच नै दिसून राहिले ना ब्बॉ…’ यवतमाळमध्ये पावसाचं रौद्ररुप! सर्वदूर जोरदार हजेरी

Yavatmal Rain : धुव्वाधार पावसाचा एक व्हिडीओ यवतमाळमध्ये व्हायरल झाला असून या व्हिडीओ पावासाच्या सरींची तीव्रता प्रचंड असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

Video : 'काहीच नै दिसून राहिले ना ब्बॉ...' यवतमाळमध्ये पावसाचं रौद्ररुप! सर्वदूर जोरदार हजेरी
धुव्वाधार पाऊस...
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 10:34 AM

यवतमाळ : महाराष्ट्रात मान्सून पावसाला (Monsoon Rain News) सुरुवात झाली आहे. तर तिकडे यवतमाळमध्ये (Yavatmal Rain Video) वादळ सदृश्य पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासर पावसाच्या जोरादर सरींनी यवतमाळमध्ये हजेरी लावली. मुसळधार पावासामुळे संपूर्ण यवतमाळ सुखावलाय. वातावरणात गारवा निर्माण झालाय. दरम्यान, धुव्वाधार पावसाचा एक व्हिडीओ यवतमाळमध्ये व्हायरल (Rain viral video) झाला असून या व्हिडीओ पावासाच्या सरींची तीव्रता प्रचंड असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय. एका पेट्रोल पंपावरुन काढण्यात आलेला हा व्हिडीओ व्हायरल जालाय. ‘काहीच नाय दिसून राहिले ना ब्बॉ’ असं म्हणत भयभीत झाले असल्याचं दिसतंय. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील दिघी, गळव्हा परिसरात जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं रस्त्यावरील दृश्यमानताही कमी झाली होती. पावसाचं रौद्र रुप यवतमाळच्या जनतेनं अनुभवलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने उभी वाहने पडली होता. तर रस्त्यावरच्या फलकांचीही पडझड झाली.

पाहा व्हिडीओ :

उमरखेड तालूक्यातील नारळी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नारळी गावातील नागरिकाचे खूप प्रमाणात नुकसान झालंय. नारळी गावामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामूळे लाईनचे पोल जमिनीतून तुटून पडले. तर काही पोल मध्य भागातून तुटून पडले. तसेच अनेक नागरिकांच्या घरावरील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पत्रे उडाले. वादळी वाऱ्यामुळे झाडे सुद्धा जमिनीवर कोसळली. या पावसामुळे नारळी गावाचे नागरिकाचे खूप प्रमाणात नुकसान झाले. शनिवारपासून गावाचा वीज पुरवठा खंडित आहे

मुसळधार हजेरी…

मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातीलही बहुतांश जिल्ह्याताल पावसाने शनिवारी झोडपून काढलं होतं. रात्री देखील सर्वदूर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवसात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडेल, असी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या 48 तासांत झालेल्या पावसाने महाराष्ट्राचा बहुतांश भाग सुखावला आहे. तापमानातही घट झाली असून उकाड्यापासून लोकांना दिलासा मिळालाय.

राज्यात्यातील एकूण 19 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खालील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  1. पुणे
  2. ठाणे
  3. पालघर
  4. मुंबई
  5. धुळे
  6. नंदुरबार
  7. जळगाव
  8. नाशिक
  9. नगर
  10. कोल्हापूर
  11. सांगली
  12. सातारा
  13. नांदेड
  14. उस्मानाबाद
  15. सोलापूर
  16. औरंगाबाद
  17. जालना
  18. बीड
  19. हिंगोली

मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण तयार झालंय. राज्याच्या किनारपट्टीपासून ते दक्षिण कर्नाटकापर्यंत कमी दाबाचा पट्ट सक्रिया आहे. त्या पट्ट्यासोबतच दक्षिण गुजरातपासून ते मध्य अरवी समुद्रापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झालीय. यामुळे मान्सून वेगानं आगेकूच करतोय.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.