INDIA च्या सभेची तयारी सुरु, नव्या लोगोचे अनावरण, ‘हा’ महत्वाचा निर्णय घेणार, आतील गोटातील माहिती आली समोर…

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. INDIA आघाडीत सामील झालेल्या २६ पक्षांचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित रहाणार आहेत. INDIA आघाडीची मुंबईत होणारी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

INDIA च्या सभेची तयारी सुरु, नव्या लोगोचे अनावरण, 'हा' महत्वाचा निर्णय घेणार, आतील गोटातील माहिती आली समोर...
INDIA LOGO Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 6:29 PM

मुंबई : 24 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी प्रमुख पक्ष एकवटले आहेत. दिल्ली त्यानंतर बंगळूर येथे विरोधी पक्षाच्या बैठका झाल्या. दिल्ली येथे सुरवातीला कमी असलेल्या पक्षांची संख्या वाढून ती जवळपास २६ इतकी झाली आहे. बंगळूर येथे झालेल्या बैठकीमध्ये या आघाडीला INDIA असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी INDIA हे नाव सुचवले होते. त्याला सर्वच पक्षांनी बहुमताने मंजुरी दिली. याच INDIA आघाडीची आता मुंबईमध्ये एक बैठक होणार आहे.

26 पक्षांचे समर्थन असलेल्या INDIA आघाडीची तिसरी आणि महत्वाची बैठक मुंबईमध्ये होत आहे. बंगळूर येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. याच बैठकीमध्ये INDIA आघाडीचे संयोजक कोण असणार? हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर मुंबईच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीमध्ये INDIA आघाडीच्या लोगोचे अनावरण करण्यात येणार आहे. भारतीय झेंड्यामध्ये ज्याप्रमाणे तीन रंग आहेत. तशाच प्रकारचा हा लोगो असणार आहे. मात्र, या लोगोमध्ये चार रंग असतील. त्या रंगांच्या माध्यमातून देशातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न INDIA आघाडी करणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

INDIA आघाडी या नावाला साजेसा असा हा नवा लोगो असणार आहे. INDIA आघाडीचा संयोजक असावा याबाबत मतमतांतरे आहेत. पण, कुणीही संयोजक नसावा, कोणत्याही पक्षाचा प्रमुख नसावा. त्याऐवजी 11 सदस्यांची समिती नेमावी अशी भूमिका शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) घेतली आहे.

कोण असेल समितीमध्ये?

11 सदस्यांची समितीमध्ये शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी (शरद पवार गट), तृणमूल काँग्रेस, डावे, द्रमुक या प्रमुख पक्षांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असेल.

असा असेल लोगो…

चार रंग आणि इटालिक फॉन्ट मध्ये ‘इंडिया’ असा या आघाडीचा लोगो असेल. या लोगोमध्ये तिरंग्याचे सर्व रंग असतील. मात्र, यात आणखी एका रंगाचा समावेश करण्यात आला आहे. भगवा, पांढरा, निळा आणि हिरवा असे चार रंग या लोगोमध्ये आहेत. हा लोगो इटालिक फॉन्टमध्ये असेल.

INDIA आघाडीचे एकूण 9 लोगो तयार करण्यात आले होते. मात्र, बहुतांश पक्षांना यातील एकच लोगो आवडला आहे. आघाडीमधील सर्व प्रमुख पक्षांना अंतिम लोगो दाखवला जाणार आहे. त्यानंतर मुंबई सभेच्या सुरुवातीलाच लोगोवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

कोणताही जाहीरनामा नसेल

निवडणुकीत उतरताना या आघाडीचा कोणताही जाहीरनामा असणार नाही. मात्र, निवडणुकीपूर्वी संयुक्त अजेंडा जाहीर केला जाणार आहे. मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये ‘इंडिया’ आघाडीचा सामायिक असा 6 सूत्री अजेंडा ठरणार आहे.

INDIA आघाडीच्या मुंबईतील बैठकीपूर्वी २९ तारखेला अंतिम अजेंडा ठरणार आहे. त्यानंतर ३० तारखेला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. ३१ तारखेला INDIA आघाडीचे सगळे नेते मुंबईत येतील, त्यानंतर ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.