Wardha Rain Update : वर्धा जिल्ह्यात पूर ओसरायला सुरुवात, रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूक अद्यापही बंद
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.
वर्धा – वर्धा (Wardha) जिल्ह्यात सततच्या पावसामुळे नदी, नाले पुन्हा ओसंडुन वाहू लागली आहेत. हिंगणघाट (Hinganghat) तालुक्यातील कान्होली (Kanholi) गावाला सुद्धा मंगळवारी जोरदार पाऊस झाल्याने पुराने विळखा घातला होता. दरम्यान प्रशासनाने आगोदरचं खबरदारी म्हणून 15 कुटुंबातील 51 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले होते. आज सकाळपासून गावातील पाणी ओसरले असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली. उर्वरित सर्व नागरिक सुरक्षित असून गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर पाणी असल्याने अद्यापही गावात जाणारी वाहतूक बंद आहे अशी माहिती मिळाली आहे.
कान्होली या गावाला एका महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका
कान्होली या गावाला एका महिन्यात दुसऱ्यांदा पुराचा फटका बसला आहे. या गावाचे दोन टप्प्यात पुनर्वसन झाले असून उर्वरित नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. पण अद्याप मदत मिळाली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. दुसऱ्यादा पूर आल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. तसेच हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा रेड अलर्ट जारी केला असल्याने महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात या आठवड्यातही मुसळधार पाऊस सुरू राहील. 14 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. या दरम्यान राज्याच्या विविध जिल्ह्यात हलका ते मुसळधार पाऊस मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. पावसाचा सर्वाधिक परिणाम कोकणात झाला असून मुसळधार पाऊस सुरु आहे. रायगड, रत्नागिरी, सांगली, पुणे आणि सातारा मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातली अनेक धरणं भरली असून नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद आहेत. तसेच ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या भागात जिल्हा प्रशानाने घरातून बाहेर न पडण्याच्या सुचना जारी केल्या आहेत. जी लोक पुराच्या पाण्यात अडकली आहे, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.