Eknath -Thackeray: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनी टिळा लावावा, पंतप्रधान मोदींशीही चर्चा करावी, दीपक केसरकर यांचे आवाहन

उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी आग्रह केला नसता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असे केसरकर म्हणाले. आता एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा  टिळा लावावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी, असेही केसरकर म्हणाले.   

Eknath -Thackeray: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांनी टिळा लावावा,  पंतप्रधान मोदींशीही चर्चा करावी, दीपक केसरकर यांचे आवाहन
Shinde-Thackeray-ModiImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 8:14 PM

मुंबई– उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या आशीर्वादाने युती व्हावी, असे आवाहन बंडखोर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्यात चांगले संबंध आहेत. मोदी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी यात आशीर्वाद द्यावा, ते मोदींशी बोलले तर हा विषय लवकर मार्गी लागेल असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीड वर्षांपासून शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपासाबोत जावे, असे सांगत होते, मात्र त्यावेळी उद्धव यांनी ऐकले नाही. जेव्हा सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे उद्धव ठाकरे जेव्हा म्हणाले होते तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर एकनाथ शिंदे यांचे नावच होते. शरद पवारांनी आग्रह केला नसता तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असे केसरकर म्हणाले. आता एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा  टिळा लावावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करावी, असेही केसरकर म्हणाले.

उद्धव यांच्या आशीर्वादाने शिंदे मुख्यमंत्री व्हावेत

दीपक केसरकर यांनी असे सुचवले आहे की, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टीळा लावत, त्यांना मुख्यमंत्री करावी, असा सूर दीपक केसरकर यांनी आळवला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रस्तावावर भाजपा काय भूमिका घेते हेही पाहावे लागेल, असेही केसरकर म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी यासाठी पुढाकार घ्यावा असेही ते सांगतायेत. राज्यातल लवकरात कलकर सत्ता स्थापन व्हावी, हीच बंडखोर आमदारांची इच्छा असल्याचेही केसरकर यांनी सांगितले आहे. शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र यावे, याच इच्छेतून दुपारी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते, असेही केसरकर म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत आदर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाकडूनही बंडखोर नव्हे शिवसेना उलेलेख

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर, तातडीने भाजपाच्या कोअर टीमची बैठक आमंत्रीत करण्यात आली होती. या बैठकीत राज्यात आणि विधिमंडळात होणाऱ्या परिस्थीतीचा अंदाज घेण्यात आला. याबाबतची भूमिका भाजपा लवकरच ठरवेल, असे सांगण्यात आले आहे. सध्या वेट अंड वॉचची भूमिका असल्याचे भाजपाने स्पष्ट केले आहे. बंडखोर आमदार यांना बंडखोर नव्हे तर ते शिवसेनेचे आहेत, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. नव्या सरकार स्थापनेबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आलेला नाही. विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव दिल्यानंतर, कोअर टीम निर्णय करेल, असे त्यांनी सांगितले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.