शहरांत ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम जास्त, काय करता येईल उपाययोजना? विजय पाटील यांनी सांगितले

अर्जुन या झाडाचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो. इथे जीवघेण्या कॅन्सरवर गुणकारी अशा झाडाची माहितीही पाटील यांनी दिली. सदर शिक्षण केंद्राला बॉटनीचे अनेक विद्यार्थी आवर्जून भेट देतात.

शहरांत ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम जास्त, काय करता येईल उपाययोजना? विजय पाटील यांनी सांगितले
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:09 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी, ठाणे : संपूर्ण देशात सध्या उन्हाचे प्रचंड चटके बसत आहेत. उष्माघाताने अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. प्रचंड जंगलतोड झाल्याने सृष्टीचा समतोल बिघडला आहे. त्यामुळेच हे असणारी संकट कोसळले असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यावर रामबाण उपाय म्हणजे शहरात जागोजागी छोटे छोटे ग्रीन झोन्स बनवण्यात यावे. यामुळे शहरातील तापमानाचा समतोल राखण्यास मदत होईल. असे ठाणे महानगरपालिकेच्या दत्ताजी साळवे निसर्ग शिक्षण केंद्राचे विजय पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. सूर्य सध्या आग ओकत आहे. पारा 42 ते 43 डिग्रीच्या पुढे गेलेला दिसत आहे. शहरात जागोजागी दिसणारे प्रचंड वृक्ष शहरीकरणाच्या आड येत असल्याने कापण्यात आले. त्यामुळेच सृष्टीचा समतोल बिघडला आहे. हा समतोल राखला गेला नाही तर भविष्यात आणखी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे तज्ज्ञ सांगतात.

500 हून जास्त झाडांचे संगोपन

विजय पाटील यांनी अथक परिश्रम घेऊन ओसाड पडलेल्या आणि कचऱ्याचे ढीग पडलेल्या जागेत नंदनवन फुलवले आहे. या शिक्षण केंद्रात देशी आणि विदेशी अशा जवळपास 500 हून जास्त झाडांचे संगोपन केले. त्यात अनेक प्रकारची आयुर्वेदिक औषधी झाडांचा समावेश आहे. या निसर्ग केंद्रात केवळ रुद्राक्षाच्या सहाहून जास्त जाती असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.

या शिक्षण केंद्रात विविध प्रकारची रुद्राक्षाची झाडे, बेहडा, अर्जुन, हिरडा, कुंकू, शिवण, हसन, पळस, कांचन, डोकेमाळी सारख्या अनेक झाडांचा समावेश आहे. यांचा वापर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यासाठी होतो. इथं बिक्सा ओरिलानो म्हणजे शेंद्री हे झाडसुद्धा आहे. डोकेमाळी आणि मुकड शेंग या झाडांच्या डिंक आणि सालीचा वापर लहान मुलांमध्ये होणाऱ्या पोटदुखीवर होतो, अशी माहिती पाटील यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

thane 2 n

अनेक प्रकारचे फुल आणि फळंही

या नैसर्गिक केंद्रात रक्तचंदन, कमांडल या अत्यंत दुर्मिळ झाडांचाही समावेश करण्यात आला आहे. दालचिनी, ऑल स्पाईस, तमालपत्र सारखी अनेक सुगंधी मसाल्याची झाडे आहेत. दक्षिण अमेरिकेत सापडणाऱ्या कोकोचे झाडही या निसर्ग केंद्रात आहे. यापासून चॉकलेट आणि कॉफीची निर्मिती होते. जायन्ट ग्रीन बांबूसारख्या बांबूच्या सात ते आठ प्रजाती इथे पहायला मिळतात. अनेक प्रकारची फुले आणि फळझाडेही पाटील यांनी जोपासली आहेत.

अर्जुन या झाडाचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो. इथे जीवघेण्या कॅन्सरवर गुणकारी अशा झाडाची माहितीही पाटील यांनी दिली. सदर शिक्षण केंद्राला बॉटनीचे अनेक विद्यार्थी आवर्जून भेट देतात. परंतु सरकारी शाळा मात्र आपल्या विद्यार्थ्यांना इथे कधीच आणत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. इथे असलेल्या मोकळ्या जागेत ठाणे महापालिकेने आपल्याला पॉलीहाऊस बनवून द्यावे. म्हणजे देश विदेशातील अनेक दुर्मिळ झाडे आपण आणून लावू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.