Thane Crime : होमगार्ड बनला पोलीस आणि मित्राला बनवलं टीसी, चालत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लूट; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश

काही प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे पावती आणि ओळखपत्र मागितलं. मात्र हे दोघं गडबडले. प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी याबाबत रेल्वे हेल्पलाईनला फोन करत माहिती दिली. रेल्वे पोलीस कसारा येथे गाडीत शिरले. मात्र विनायक व धीरज यांनी इगतपुरी येथे उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

Thane Crime : होमगार्ड बनला पोलीस आणि मित्राला बनवलं टीसी, चालत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लूट; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश
होमगार्ड बनला पोलीस आणि मित्राला बनवलं टीसी, चालत्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची लूटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 09, 2022 | 9:37 PM

ठाणे : पोलीस (Police) आणि टीसी (TC) असल्याची बतावणी करत धावत्या मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुबाडणाऱ्या होमगार्ड व त्याच्या मित्राचा प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी होमगार्डला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत, तर त्याचा साथीदार पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विनायक त्र्यंबक, धीरज जाधव अशी या दोघांची नावे असून विनायक त्र्यंबक हा अंबरनाथ रेल्वे स्थानकावर होमगार्ड पदावर कार्यरत होता. या दोघांची त्याच दिवशी भेट झाली. पैशांची गरज असल्याने या दोघांनी ही शक्कल लढवली, मात्र काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे होमगार्डची जेलवारी झाली.

झटपट पैसे मिळवण्यासाठी आरोपींनी लढवली शक्कल

झटपट पैशांच्या हव्यासा पोटी कोण काय शक्कल लढवेल याचा काही नेम नाही. कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात एक असाच गुन्हा दाखल करण्यात आहे. अंबरनाथ येथे राहणारा विनायक त्र्यंबक हा रेल्वेत होमगार्डमधून काम करत. दोन दिवसांपूर्वी त्याला त्याचा मित्र धीरज जाधव भेटला. दोघांनी पैशांसाठी एक शक्कल लढवण्याचे ठरवले. विनायक होमगार्ड असल्याने त्याच्या खाकी कपड्यामुळे तो पोलीस नसल्याचा कुणाला संशय येणार नाही. तसेच धीरजने स्वतः टीसी बनून वावरण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी कल्याणहून वाराणसीकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. मेल सुरू होताच दोघांनी पोलीस आणि टीसी असल्याची बतावणी करत प्रवाशांकडे पैशांची मागणी केली. काही जणांनी पैसे दिल्यानंतर त्यांचा हुरूप वाढला. त्यांनी आणखी काही जणांना धाक दाखवत पैशांची मागणी केली.

प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश

काही प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्याकडे पावती आणि ओळखपत्र मागितलं. मात्र हे दोघं गडबडले. प्रवाशाला संशय आल्याने त्यांनी याबाबत रेल्वे हेल्पलाईनला फोन करत माहिती दिली. रेल्वे पोलीस कसारा येथे गाडीत शिरले. मात्र विनायक व धीरज यांनी इगतपुरी येथे उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी पाठलाग करत या दोघांमधील विनायक याला पकडलं. तर झटापटीत धीरज पळून जाण्यात यशस्वी ठरला. या दोघांविरोधात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार धिरजचा शोध पोलीस घेत आहेत. (Fake police and TC arrested by kalyan grp for robbing passengers in a moving train)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.