Dombivali News : स्टेशन परिसरात रिकामटेकड्या बसलेल्यांवर कारवाईचा बडगा, दोन तासात जोडप्यांसह 25 जणांवर कारवाई

स्टेशन परिसर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करण्याचे सत्र वाढले आहेत. यामुळे स्टेशन परिसरातील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी रिकाम टेकडे बसणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Dombivali News : स्टेशन परिसरात रिकामटेकड्या बसलेल्यांवर कारवाईचा बडगा, दोन तासात जोडप्यांसह 25 जणांवर कारवाई
स्टेशन परिसरात रिकाम टेकडे बसणाऱ्यांवर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 24, 2023 | 2:49 PM

डोंबिवली / 24 ऑगस्ट 2023 : स्टेशन परिसरात रिकाम टेकडे बसलेल्यांविरोधात आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डोंबिवलीत स्टेशन मास्तर, लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. कॉलेज चुकवून रेल्वेच्या फलाटावर फ्लर्ट करणारे, तिकीट काढून फलाटावर तासनतास टाईमपास करणाऱ्या प्रेमी युगुलावर डोंबिवली रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि स्टेशन मास्तर कार्यालयाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकत्रितपणे 25 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

स्टेशनवरील वाढत्या चोऱ्या पाहता गर्दी टाळण्यासाठी पोलिसांची कारवाई

रेल्वे फलाटावर गर्दी करत तासनतास बसणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेक तरुण-तरुणी कॉलेज बुडवून रेल्वे स्टेशनवर टाईमपास करताना दिसतात. अनेक प्रेमी कोपरे पकडून चाळे करताना दिसतात, तर अनेक जण तिकीट काढून केवळ रेल्वे फलाटावर फिरत राहतात. याचाच फायदा लोकल पकडण्याच्या किंवा उतरण्याच्या गडबडीत असलेल्या प्रवाशांचे मोबाईल आणि पर्स चोरणारे चोरटे घेतात. यामुळेच फलाटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही थांबू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्टेशन परिसरात कामाशिवाय न बसण्याचा इशारा

डोंबिवली रेल्वे स्थानकात डोंबिवली रेल्वे पोलिसांबरोबरच आरपीएफ आणि स्टेशन मास्तर कार्यालयाकडून पाचही फलाटावर संयुक्तिक कारवाई करण्यात आली. रिकाम टेकड्यांना दणका देत जवळपास दोन तासात 25 ते 30 जणांवर कारवाई करत अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं. डोंबिवली स्टेशन परिसरात कामाशिवाय फिरू नये असे आव्हान करत रिकाम टेकड्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.