Ambernath Accident : अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडक, एक प्रवासी जखमी

हुतात्मा चौकाकडून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिजामाता जिमसमोर कारचालक गणेश आवटे यांनी त्यांनी इको गाडी उभी केली होती. तर त्यांच्या कारच्या समोरच एका रिक्षाचालकाने त्याची रिक्षाही लावली होती. यावेळी हुतात्मा चौकाकडून आलेल्या एका आयशर ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे इको कार रिक्षेला आणि रिक्षा समोरच्या पथदिव्याच्या खांबाला जाऊन धडकली.

Ambernath Accident : अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडक, एक प्रवासी जखमी
अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 1:41 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका ट्रकने कार (Car) आणि रिक्षा (Rikshaw)ला धडक दिल्याची घटना घडली आहे. हुतात्मा चौकाकडून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिजामाता जिमसमोर हा अपघात (Accident) घडला. या अपघातात रिक्षातील एक प्रवासी जखमी झाला आहे. तसेच कार आणि रिक्षाचेही नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रक चालक गाडी घेऊन पळून चालला होता. मात्र कारचालकाने त्याचा पाठलाग केला. यावेळी ट्रक चालक पळून गेला तर क्लिनरला पकडण्यात आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला असून याबाबत पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नाही.

अपघातात कार आणि रिक्षाचं नुकसान

हुतात्मा चौकाकडून स्वामी समर्थ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जिजामाता जिमसमोर कारचालक गणेश आवटे यांनी त्यांनी इको गाडी उभी केली होती. तर त्यांच्या कारच्या समोरच एका रिक्षाचालकाने त्याची रिक्षाही लावली होती. यावेळी हुतात्मा चौकाकडून आलेल्या एका आयशर ट्रकने इको कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे इको कार रिक्षेला आणि रिक्षा समोरच्या पथदिव्याच्या खांबाला जाऊन धडकली. या अपघातात रिक्षेत बसलेला अर्जुन पाटील हा प्रवासी जखमी झाला. तर कार आणि रिक्षा या दोन्ही वाहनांचं नुकसान झालं. या अपघातानंतर आयशर ट्रकचा चालक ट्रक घेऊन तिथून पळून गेला. यावेळी कारचालक गणेश आवटे यांनी पाठलाग करून ट्रकच्या क्लिनरला पकडून आणलं, तर चालक मात्र पळून गेला. ट्रक मालक आणि नुकसानग्रस्त वाहनचालक यांनी आपसात समझोता करून प्रकरण पोलीस ठाण्याबाहेरच मिटवल्याचं पोलिसांनी सांगितलं. (A passenger was injured when a truck hit a car and a rickshaw in Ambernath)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.