Ulhasnagar Girl : उल्हासनगरात आई रागावल्यानं 11 वर्षीय मुलीनं घर सोडलं, प्राध्यापिकेच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरूप

उल्हासनगरच्या कॅम्प 3 सम्राट अशोक नगरमधील लोकसेवा सोसायटीत राहुल शिरसाट हे कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांना खुशी ही 11 वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी दुपारी खुशीची आई कामावर गेलेली असतानाया खुशीच्या आजीने खुशीच्या आईला फोन केला आणि खुशीची तक्रार केली. त्यावर खुशीच्या आईने मी घरी आल्यावर तुला बघते असा दम दिल्याने खुशी घाबरली.

Ulhasnagar Girl : उल्हासनगरात आई रागावल्यानं 11 वर्षीय मुलीनं घर सोडलं, प्राध्यापिकेच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरूप
उल्हासनगरात आई रागावल्यानं 11 वर्षीय मुलीनं घर सोडलंImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 2:49 AM

उल्हासनगर : आई रागावली (Angry) म्हणून एका 11 वर्षांच्या मुली (Girl)नं घर सोडून थेट कर्जत गाठल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडलीये. सुदैवानं लोकल प्रवासात एका प्राध्यापिके (Professor)ला ही मुलगी दिसली आणि त्यांनी तिची चौकशी करत समजूत काढली आणि तिला सुखरूप पुन्हा तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं. त्यामुळं या मुलीच्या पालकांनी प्राध्यापिकेचे आभार मानले आहेत. हल्ली लहान मुलं अगदी छोट्या छोट्या कारणावरून नाराज होतात आणि अगदी घर सोडून जाण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेतात. लहान मुलांची ही मानसिकता का बदलत चालली आहे? याचा विचार होणं गरजेचं असून पालकांकडूनही मुलांना वेळ देणं, त्यांच्याशी संवाद साधणं या गोष्टी होणं गरजेचं आहे. कारण पालक आणि मुलांमध्ये जर संवादाचं नातं आणि बॉण्डिंग असेल, तरच या गोष्टी टाळता येऊ शकतील.

आई रागावल्याने मुलीने घर सोडले

उल्हासनगरच्या कॅम्प 3 सम्राट अशोक नगरमधील लोकसेवा सोसायटीत राहुल शिरसाट हे कुटुंबासह वास्तव्याला असून त्यांना खुशी ही 11 वर्षांची मुलगी आहे. मंगळवारी दुपारी खुशीची आई कामावर गेलेली असतानाया खुशीच्या आजीने खुशीच्या आईला फोन केला आणि खुशीची तक्रार केली. त्यावर खुशीच्या आईने मी घरी आल्यावर तुला बघते असा दम दिल्याने खुशी घाबरली आणि दुपारी दोन वाजता घरातून निघून गेली. तिथून तिनं थेट रेल्वे स्टेशन गाठत कर्जतला जाणारी लोकल पकडली. ही लोकल कर्जतला पोहोचल्यानंतर त्याच लोकलनं तिनं मुंबईच्या दिशेने उलट प्रवास सुरू केला. सुदैवानं या लोकलमध्ये कर्जतच्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका असलेल्या शीतल बोरिटकर या बदलापूरला त्यांच्या घरी येण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांना खुशी ही एकटीच दिसल्यानं त्यांनी तिची चौकशी केली. मात्र सुरुवातीला खुशीने त्यांना उडवाउडवीची उत्तरं दिली. यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारलं असता, तिनं तिच्या शाळेचं नाव सांगितलं. त्यावरून बोरिटकर यांनी गुगलवरून शाळेचा नंबर काढत शाळेशी संपर्क साधला आणि खुशीच्या पालकांना याबाबत माहिती देण्यास सांगितलं.

प्राध्यापिकेच्या सतर्कतेमुळे मुलगी सुखरुप

इकडे खुशीच्या पालकांनी खुशी निघून गेल्यानंतर मध्यवर्ती पोलीस स्टेशन गाठत तक्रार केली. त्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तातडीने सूत्रं फिरवली. यानंतर खुशी ही गोशाळेकडे जाताना सीसीटीव्हीत कैद झाल्याचं पोलिसांना आढळलं. त्यातच खुशीच्या पालकांना शाळेतून खुशीला एका प्राध्यापकांनी नेरळ स्टेशनला उतरवून घेतल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार मध्यवर्ती पोलिसांनी नेरळ स्टेशन गाठत खुशीला अवघ्या काही तासात पुन्हा एकदा सुखरूप उल्हासनगरमध्ये आणलं आणि तिच्या पालकांच्या ताब्यात दिलं.

हे सुद्धा वाचा

या सगळ्यानंतर खुशीच्या आईने प्राध्यापिका शीतल बोरिटकर यांचे आभार मानले. क्षुल्लक रागावण्यावरून माझी मुलगी निघून गेली होती. आता ती परत कधीच सापडणार नाही, असं मला एका क्षणासाठी वाटून गेलं होतं. पण शीतल बोरिटकर यांच्यामुळे खुशी परत आली असून त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, असं खुशीची आई प्रियांका यांनी सांगितलं. (11 year old girl leaves home after mother gets angry in Ulhasnagar)

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.