बकऱ्या द्या….दप्तर घ्या….विद्यार्थ्यांनी केले भन्नाट आंदोलन, झाली जोरदार चर्चा…
शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही तो मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले जात असतांना नाशिकमध्ये शाळा यूनिट बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
नाशिक : पटसंख्येच्या मुद्द्यावरून राज्यातील अनेक शाळा (School) बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहेत. त्याचाच फटका इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील दरेवाडी येथील विद्यार्थ्यांना बसला आहे. तब्बल एक महिन्यापासून शाळा यूनिट बंद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी याबाबत निवेदन देत शाळा सुरू करण्याची मागणी केली होती. आदिवासी भागातील (Tribal Area) चाळीस कुटुंबासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती. मात्र, पटसंख्येच्या अभावी शाळा यूनिट बंद झाल्याने महिनाझाला शाळा भरत नसल्याने विद्यार्थी आणि पालक आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी नाशिकमध्ये येत जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर बकऱ्या हातात घेऊन येत बकऱ्या द्या….दप्तर घ्या….अशा घोषणा देत अनोखे आंदोलन सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोरून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाचेच हे आंदोलन लक्ष वेधून घेत आहे
शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही तो मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले जात असतांना नाशिकमध्ये शाळा यूनिट बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
पटसंख्येच्या मुद्द्यावरून नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील शाळा यूनिट बंद करण्यात आले होते.
आदिवासी भागातील दरेवाडी येथे चाळीस कुटुंबासाठी ही शाळा सुरू करण्यात आली होती, मात्र आता पटसंख्या नसल्याने शाळा बंद केली आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना पत्र देत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून ज्यांनी हा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाईची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
यापूर्वी शाळा सुरू करावी यासाठी दरेवाडी येथील नागरीकांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते, मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनोखे आंदोलन केले आहे.
40 कुटुंबासाठी ही पहिली ते पाचवी अशी शाळा जिल्हा परिषद अंतर्गत सुरू होती, एक महिन्यापासून मुले शिक्षणापासून वंचित आहे.