Jaykumar Gore : आमदार जयकुमार गोरे यांना 9 जूनपर्यंत अटकपासून संरक्षण, काय जमीन करार प्रकरण? ज्यामुळे अडचणी वाढल्या

मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीचा करार केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी अटकेपासून जरी संरक्षण मिळाले असले तरी मात्र जयकुमार गोरे यांना फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jaykumar Gore : आमदार जयकुमार गोरे यांना 9 जूनपर्यंत अटकपासून संरक्षण, काय जमीन करार प्रकरण? ज्यामुळे अडचणी वाढल्या
जयकुमार गोरेंकडून मृत मागासवर्गीय व्यक्तीची जमीन लाटण्याचा प्रयत्नImage Credit source: फेसबुक
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:55 PM

सातारा : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) गेल्या काही दिवसांपासून वादात सापडले आहेत. कारण जयकुमार गोरेंविरोधात साताऱ्यात एका जमीन प्रकरणात गुन्हा (Satara Police) दाखल झाला आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र त्यानंतर जयकुमार गोरे यांनी कोर्टात धाव घेतली आणि त्यांना आता काहीसा दिलासा मिळा आहे. कारण आमदार जयकुमार गोरे यांना 9 जूनपर्यंत कोर्टाने अटकेपासून संरक्षण दिलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी त्यांची अटक टळली आहे. हे आदेश मुंबई उच्च न्यायलयाने (Bombay High Court) काढले आहेत. मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करुन जमिनीचा करार केल्या प्रकरणी गोरे यांच्यावर आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या ठिकाणी अटकेपासून जरी संरक्षण मिळाले असले तरी मात्र जयकुमार गोरे यांना फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे काय आहे प्रकरण?

माणचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणी एका जमीन प्रकरणात वाढल्या आहेत. दहीवडी पोलीस ठाण्यात महादेव पिराजी भिसे यांच्या तक्रारीवरून जयकुमार गोरे यांच्यासह अन्य चार साथीदारांविरुद्ध ऑट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.  मायणी येथील छत्रपती शिवाजी महाराज एज्युकेशनच्या जागेत जाण्यासाठी गट नंबर 769 मधील अल्पभूधारक, जो मयत आहे, त्याला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तावेज करून अल्पभूधारक कुटुंबाची फसवणूक केल्याचा गोरेंवर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाने सध्या साताऱ्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. या गुन्ह्याबाबत दहिवडीचे उपविभागीय पोलिस आधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल

गेल्या निवडणुकीआधी खटाव काँग्रेसचा राजीनामा देऊन जयकुमार गोरे भाजपमध्ये दाखल झाले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात सख्खे बंधू शेखर गोरे यांनी आव्हान दिले होते आणि या ठिकामाही विजयरी झाले.  भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला होता मात्र त्याचवेळी शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली होती. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज झाल्याने विधानसभा निवडणुकीची लढत रंगतदार झाली होती, त्यात जयकुमार गोरे हे विजयी झाले. साताऱ्याच्या राजकारणात जयकुमार गोरे हे नाव नेहमीच चर्चे राहिलं आहे. जयकुमार गोरे यांच्या फिटनसेची आणि त्यांच्या सवयींचीही साऱ्यात बरीच चर्चा असते. मात्र आता अशा प्रकरणात गोरेंच नाव समोर आल्याने वेगळ्याच राजकीय चर्चा रंगत आहेत.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.