Sangli Accident : भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगनारची समोरसमोर धडक! दोघे ठार, तिघांची प्रकृती गंभीर

सांगलीच्या आयर्विन पुलावर भीषण अपघात झालाय. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघतात दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 5 ते 7 लोक जखमी झाले असून त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

Sangli Accident : भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगनारची समोरसमोर धडक! दोघे ठार, तिघांची प्रकृती गंभीर
सांगलीच्या आयर्विन पुलावर कार आणि टेम्पोचा भीषण अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 6:54 AM

सांगली : शहरातील आयर्विन पुलावर (Irwin Bridge) भीषण अपघात झालाय. भजनी मंडळाचा टेम्पो आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघतात (Accident) दोन जणांचा जागीच मृत्यू झालाय. तर 5 ते 7 लोक जखमी झाले असून त्यातील 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय. मृतांमध्ये एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. तर जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहणांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार टेम्पोमधून 12 जण शिरोळला भजनाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यावेळी आयर्विन पुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

गाड्यांचा चक्काचूर!

MH 10 DL 2886 या क्रमांची वॅगनार आणि MH 10 AQ 5033 क्रमांकाचा एक टेम्पो यांच्या समोरासमोज जोरदार धडक झाली. ही धडक प्रचंड भीषण होती. या टेम्पो आणि वॅगनार यांच्या दर्शनी भागाचं प्रचंड नुकसान झालंय. दोन्ही गाड्यांच्या काचा यात धडकेच फुटल्या. तर गाडीतील प्रवाशांनाही जोरदार धक्का बसला. टेम्पोच्या स्टेअरींगसह दरवाडा आणि इतर भागाचंही मोठं नुकसान झालं. तर वॅगनारच्या इंजिनला धडकेच मार बसून समोरची काच चक्कचूर झाली.

भरधाव वेगामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जातेय. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे भजनी तर जखमींनी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या अपघातातील जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. टेम्पोमधील सर्व जण शिरोळला भजन कार्यक्रमाला जात असताना ही दुर्घटना घडली.

हे सुद्धा वाचा

रस्ते अपघातांची मालिका

राज्यातील रस्ते अपघातांची मालिका चिंतेचा विषय ठरु लागली आहे. वाढत्या अपघातांमुळे रस्ते अपघातातील बळींचाही आकडा वाढत चालला आहे. भरधाव वेगानं गाड्या चालवल्यानं अपघात होत असून, वेगावर नियंत्रण राखण्याची जबाबदारी प्रत्येक वाहनचालकानं बाळगण्याची गरज वाढत्या अपघाताच्या घटनांनी व्यक्त केली जातेय.

पाहा Video महत्त्वाची बातमी

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.