खलिस्तानी दहशतवादी रिंडाने स्लीपर सेलच्या मदतीने नांदेडला RDX पाठवले, मुंबई लोकलमध्ये सीरियल ब्लास्टची आखली योजना?

रिंडाने नांदेडला आरडीएक्सचा मोठा साठा पाठवल्याचे सूत्रांकडून समजले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलीस अधीक्षकांनी नांदेडमध्ये रिंडासाठी 50 जण काम करत असल्याची माहितीही मिळाली होती.

खलिस्तानी दहशतवादी रिंडाने स्लीपर सेलच्या मदतीने नांदेडला RDX पाठवले, मुंबई लोकलमध्ये सीरियल ब्लास्टची आखली योजना?
हरियाणात अटक दहशतवादी प्रकरणी नांदेड पोलिसांचा तपास
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 8:09 PM

नांदेडः हरियाणात पकडलेल्या खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) संघटनेच्या बब्बर खालसाचे नांदेड कनेक्शन (Nanded connection of Babbar Khalsa) उघड होताच आता एकामागून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पाकिस्तानात राहून आपले काम पार पाडणारा दहशतवादी हरविंदर सिंग रिंडाने (Terrorist Harvinder Singh Rinda) नांदेडमध्ये उपस्थित असलेल्या स्लीपर सेलच्या माध्यमातून सक्रिय करून मोठा कट रचण्याचा प्रयत्न करत होता. रिंडाने नांदेडला आरडीएक्सचा मोठा साठा पाठवल्याचे सूत्रांकडून समजले होते. त्यानंतर शुक्रवारी पोलीस अधीक्षकांनी नांदेडमध्ये रिंडासाठी 50 जण काम करत असल्याची माहितीही मिळाली होती.

रिंडाकडून स्लीपर सेलच्या मदतीने मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीरियल ब्लास्ट करण्याचा विचार करत होता का? तसेच आरडीएक्स नांदेडला का पाठवले? याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुंबईत मालिका बॉम्बस्फोट होण्याची भीती

5-6 महिन्यांपूर्वी मुंबईत मालिका बॉम्बस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती हरविंदर सिंग रिंडा याच्याशी संबंधित असल्याचेही सांगितले जात आहे. नांदेडमध्ये जप्त केलेली आरडीएक्सचा साठा मुंबई लोकल ट्रेनमध्ये सीरियल ब्लास्टसाठी वापरली जाणार होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र एटीएसला माहिती नाही?

नांदेडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आरडीएक्स सापडल्याने आणि महाराष्ट्र एटीएसला या घटनेची माहिती का नव्हती असा सवालही उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्रात मोठे षडयंत्र

कालपर्यंत पोलिसांच्या तीन पथकांनी नांदेजमधील शेती परिसराची पाहणी केली होती. यावेळी रिंडाच्या संपर्कात असलेल्या लोकांचीही चौकशी करण्यात आली असून त्यांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. शोध पथकाकडून शोध घेतल्यानंतर काही तलवारी जप्त केल्याची माहितीही देण्यात आली आहे.

नांदेड शहरात शस्त्रास्त्रांचा साठा

हरियाणाच्या कर्नाल पोलिसांनी गुरुवारी चार दहशतवाद्यांना अटक केली. त्यानंतर त्यांची चौकशी केल्या नंतर व रिंडाच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील नांदेड शहरात शस्त्रास्त्रांचा साठा घेऊन येत असल्याचे उघड झाले. त्यामुळे महाराष्ट्रात आरडीएक्सद्वारे मोठे षडयंत्र राबवायचे होते का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

नांदेड पोलीस हरियाणाला रवाना

झाल्यानंतर नांदेड पोलिसांकडूनही कसून चौकशी सुरु केल्यानंतर काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना अटक करण्यास सुरुवात केली. त्यानंतर शुक्रवारी रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. शोध पथकाकडून पोलिसांनी किती जणांना पकडले, किती शस्त्रे जप्त केली, याबाबतची बाबती अद्याप समोर आली नाही. हरियाणात अटक करण्यात आलेल्या चौघांची चौकशी करण्यासाठी नांदेड पोलिसांचे एक पथक हरियाणातही रवाना झाले आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.