Raigad | रायगड समुद्र किनाऱ्यावरची बोट ऑस्ट्रेलियन महिलेची, इकडे कशी आली? देवेंद्र फडणवीसांनीच दिले Updates!

आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, ही बोट नेमकी कुठून आली, कुणाच्या मालकीची होती आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत कशी पोहोचली या सर्वांचा उलगडा करून सांगितला. ही प्राथमिक माहिती असली तरीही अधिकृत असून यापुढही सुरक्षेच्या बाबतीत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Raigad | रायगड समुद्र किनाऱ्यावरची बोट ऑस्ट्रेलियन महिलेची, इकडे कशी आली? देवेंद्र फडणवीसांनीच दिले Updates!
रायगड समुद्र किनाऱ्यावरील बोटीच्या तपासाची माहिती देताना देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 4:09 PM

रायगडः रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर (Raigad) येथील समुद्र किनाऱ्यानर वाहत आलेल्या बोटीमुळे (Suspicious boat) आज कोकण किनारपट्टीसह मुंबईमधील सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. मात्र प्राथमिक तपासणीनंतर या बोटीपासून कोणत्याही दहशतवादी हल्ल्याची भीती नसल्याचे सांगण्यात येत आहे. या बोटीत काही शस्त्रास्त्र साठा सापडला असला तरीही भारतात घातपात घडवण्याचा हेतू यामागे नव्हता, असेच प्रथम दर्शनी दिसत असल्याचे तपास यंत्रणांना आढळले आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून एकिकडे रायगड समुद्र किनाऱ्यावर आलेल्या बोटीने राज्यात खळबळ माजली तर विधानसभेतही या मुद्द्यावरून तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीचे तपासाचे आदेश दिले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत एक निवेदन सादर केले. त्यात आतापर्यंत झालेल्या तपासानुसार, ही बोट नेमकी कुठून आली, कुणाच्या मालकीची होती आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यापर्यंत कशी पोहोचली या सर्वांचा उलगडा करून सांगितला. ही प्राथमिक माहिती असली तरीही अधिकृत असून यापुढही सुरक्षेच्या बाबतीत सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी बोटीबद्दल दिलेली अत्यंत महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे-

  1. बोटीशी संबंधित कागदपत्र मिळून आली आहेत. ही घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. हाय अलर्ट जारी करण्यात आले. भारतीय कोस्टगार्ड व इतर संबंधित यंत्रणांनाही कल्पना देण्यात आली.
  2. आतापर्यंत मिळालेल्या माहितानुसार, सदर बोटीचे नाव लेडी हान असून तिची मालकी ऑस्ट्रेलियन नागरिक हाना लाँडर्सगन या महिलेची आहे.
  3.  तिचे पती जेम्स हार्बर्ट हे सदर बोटीचे कफ्तान असून ही बोट मस्कतहून युरोपकडे जाणार होती.
  4. दिनांक 26- 6- 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला.
  5.  त्याच दिवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली. त्यांना ओमानला सुपूर्द केले.
  6.  समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोइंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे. अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झालेली आहे.
  7.  स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
  8.  भारतीय कोस्ट गार्ड आणि केंद्रीय तपास यंत्रणांशी सतत संपर्क साधण्यात आला आहे.
  9.  यासंदर्भात ही माहिती प्राप्त झाली असली तरीही कुठेही याबद्दल सुरक्षेची काळजी कमी राहू नये यादृष्टीने सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले आहेत.
  10.  सणांचे दिवस असल्याने एखादी अनुचित घटना घडणार नाही, याकरिता सांगण्यात आलेलं आहे.

Non Stop LIVE Update
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक
Vijay Wadettiwar on children's vaccination | शाळांमध्ये मुलांसाठी लसीक.
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम
Chandrapur Tadoba मध्ये जिप्सी सफारीचा आनंद घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातम.
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं
Gadchiroli News | उपविभागीय कर्मचाऱ्यानं स्वतःच्याच कार्यालयाला ठोकलं.
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न
'Sanjay Raut आणि Uddhav Thackeray यांची नार्को टेस्ट करा', 'या' भाजप न.
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच
Mantralaya च्या सुरक्षाजाळीवर शेतकऱ्यांचं उड्या मारून आंदोलन, पोलिसांच.
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ
Gas Cylinder Price | महागाई कमी करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय, घ.
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख
Sushma Andhare यांची कुणावर खोचक टीका? म्हणाल्या कानामागून आले अन् तिख.
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द
नवाब मलिक यांची 14 ऑगस्टला जमिनावर सुटका; सत्र न्यायालयाकडून आणखी एक द.
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत काय घडले जाणून घ्या एका क्लिकवर.
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र
फडतूस, कलंक संबोधल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली, देवेंद्र.